Sunday, September 8, 2024
Homeइतिहासराहुल गांधींकडे लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून कोणते अधिकार.....

राहुल गांधींकडे लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून कोणते अधिकार…..

Rahul Gandhi opposition’s Leadear In Loksabha: अकोला दिव्य ऑनलाईन : तब्बल एका दशकानंतर लोकसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी कनिष्ठ सभागृहात विरोधी पक्षाचे नेतृत्व करतील, असे पक्षाने जाहीर केले. २०१४ व २०१९ साली काँग्रेसकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही. यंदा मात्र विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ असल्याने विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांना पत्र लिहून राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्याबाबत कळवले होते. इतर पदाधिकारी नंतर ठरवले जातील, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. या पत्राप्रमाणे राहुल गांधी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

विरोधी पक्षांचा नेता हा लोकसभेतील विरोधी पक्षांचा प्रभारी खासदार (संसद सदस्य) असतो. विरोधी पक्षनेता हा सर्वांत मोठ्या पक्षाचा संसदीय अध्यक्ष असतो किंवा विरोधी पक्षांत बसलेल्या पक्षांच्या युतीचा सदस्य असतो. भारतीय संसदेवरील २०१२ च्या पुस्तिकेत असे म्हटले आहे की, विरोधी पक्षनेत्याला अनेक अधिकार असतात. विरोधी पक्षनेता विद्यमान सरकार कोसळल्यास प्रशासनही ताब्यात घेऊ शकतो.

सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची सक्रिय भूमिका ही सरकारइतकीच महत्त्वाची आहे.विरोधी पक्षनेता हे कॅबिनेट दर्जाचे पद आहे; ज्याचे स्वतःचे भत्ते आहेत. संसद सदस्य अधिनियम, १९५४ च्या वेतन, भत्ते व निवृत्तिवेतनाच्या कलम ३ मध्ये नमूद केल्यानुसार या पदावरील व्यक्तीला दरमहा पगार आणि प्रत्येक दिवसासाठी भत्ता मिळतो. विरोधी पक्षनेता हा विविध संयुक्त संसदीय समित्यांचादेखील भाग असतो. विरोधी पक्षनेता सर्वांत महत्त्वाच्या नोकऱ्यांपैकी एक असणार्‍या निवड समित्यांचाही सदस्य असतो. या समित्या सक्तवसुली संचालनालय (ईडी), सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोग यांसारख्या संस्थांच्या प्रमुखांची नियुक्ती करतात. ते लोकपाल, तसेच निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचेही अध्यक्ष असतात. लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी या प्रमुखांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बसतील. त्यांना सरकारच्या कामकाजाचा सतत आढावा घेण्याचाही अधिकार असेल.

विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी महत्त्वाचे का?
काँग्रेस काही आठवड्यांपासून राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती करीत आहे. पक्षाच्या एका नेत्याने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “जर ते विरोधी पक्षनेते झाले नसते, तर राहुल पंतप्रधानपदाची संधी सोडत आहेत, असे वाटले असते.” इंडिया आघाडीच्या निवडीबद्दल स्पष्टीकरण देताना, काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल म्हणाले, “राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे यावर सर्व सहभागींचे एकमत झाले. निवडणुकीदरम्यान आम्ही बेरोजगारी, महागाई, महिला समानता व सामाजिक न्याय हे मुद्दे मांडले. हे मुद्दे संसदेत मोठ्या प्रमाणावर मांडले जाणे आवश्यक आहेत. संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे सर्वोत्तम व्यक्ती आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!