Thursday, January 2, 2025
Homeसामाजिकगवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र गवळी समाज संघटना जिल्हा शाखा अकोला व युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा बिडकर लान्स खडकी येथे हर्षोल्लासात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी, सचिव अशोक मंडले, युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण किसनराव हुंडीवाले, लखुआप्पा लंगोटे, विदर्भ संघटक दीपक आप्पा खताळे, सुनीता टप्पे, रामभाऊ बिरकड, सदाशिवराव सुडकर, राजेश यमगवळी, जुम्माभाई बंकूवाले, सुदर्शन वैराळकर, मनोहर आप्पा गवळी, गिरजाआप्पा खताळे, सुरेंद्र हुंडीवाले, बाबूलाल लालूवाले, कय्युमभाई, टिकाराम बरेठीया यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला विशेष सहकार्य करणारे सुधाकर लंगोटे, शंकरराव गवळी, संगप्‍पा चौधरी, सदाशिवराव सुळकर, केशवराव कळमकर, शंकरराव लंगोटे, गजानन हुंडीवाले, सुपाजी शिंदे, दुर्गाताई येवले, रतन गवळी यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांचे हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करून भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. स्वर्गीय किसनराव (दादा) हुंडीवाले यांना अभिवादन करून स्वागत समारंभाला सुरुवात झाली. हंसराजभैय्या अहिर यांचे स्वागत जिल्हा अध्यक्ष शंकरराव बिरकड व सचिव नितीन गवळी यांनी केले. सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविक गिरजाप्पा खताळे यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन हंसराज अहिर यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, गुणवंत विद्यार्थी म्हणून आपला व आपल्या पालकांचा गौरव करण्यात आला. यामुळे समाजाचा नाव लौकिक वाढतो. जिद्दीने प्रयत्न करून मिळवलेले यश अभिनंदनीय असुन इतरांनाही प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांचे पुढील आयुष्य भरभराटीचे जावो यासाठी शुभेच्छा दिल्या, त्यानंतर हिरामण आप्पा गवळी यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी व समाजबांधवांना मार्गदर्शन करुन ओबीसी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन अमोल नागाप्पा गवळी व स्वप्निल चोंडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव बिरकड, सचिव नितीन गवळी, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव लंगोटे, सुपाजी शिंदे, केशवराव कळमकर, सागर फुरंगे ,अनिल चौधरी यांनी परिश्रम घेतले. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे गिरजाप्पा खताळे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!