अकोला दिव्य ऑनलाईन : राष्ट्र विकासात उद्योग व व्यापार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. उद्योजक व व्यापारी वर्गाच्या श्रमामुळेच राष्ट्रीय विकासास हातभार लागू शकतो. म्हणून व्यापारी व उद्योजकांनी सुयोग्य व्यापार व उद्योग करून राष्ट्रीय प्रगतीत मोलाचे योगदान करावं, असे आवाहन नाथ समूहाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी केले.
खंडेलवाल भवनात विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ची 90 वी वार्षिक आमसभा आज रविवार २२ जुन रोजी उत्साहात संपन्न झाली. या आमसभेत प्रमुख पाहुणे म्हणून कागलीवाल मार्गदर्शन करीत होते.विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुरत येथील दक्षिण गुजरात चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष गिरधरगोपाल मुंदडा उपस्थित होते.
विदर्भ चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष चंदाराणा, कनिष्ठ उपाध्यक्ष राहुल गोयनका, सचिव निरव वोरा, सहसचिव निखिल अग्रवाल, कोषाध्यक्ष किशोर बाछुका व निवर्तमान अध्यक्ष नितीन खंडेलवाल मंचावर उपस्थित होते. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी यांच्या प्रतिमा पूजन आणि दिप प्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने वार्षिक आमसभेला प्रारंभ करण्यात आला.
वार्षिक आमसभेच्या प्रथम सत्रात चेंबरचे मानद सचिव निरव वोरा यांनी गतवर्षीचा लेखाजोखा सादर केला.तसेच कोषाध्यक्ष किशोर बाछुका यांनी वित्तीय अहवाल सादर केला. तो सर्व संमतीने पारित करण्यात आला.यावेळी नवीन अंकेक्षक यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मानद सचिव निरव वोरा यांनी सादर केला. या आमसभेत सन 2024-26 च्या कार्यकारणीची निवड करण्यात आली.नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून निकेश गुप्ता यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.निवडणुक अधिकारी म्हणून प्रवीण बाहेती, निरंजन अग्रवाल, रमाकांत खंडेलवाल यांनी कामकाज बघितले.
द्वितीय सत्रात चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण करून चेंबरच्या उपक्रमाची माहिती सादर केली. या कार्यक्रमात चेंबरचे वरिष्ठ सदस्य कासमअली नानजीभाई डोडीया यांना चेंबर रत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला. चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष चंदाराना यांनी त्यांच्या सन्मान पत्राचे वाचन केले. यावेळी चेंबरच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यामध्ये सीएसआर अवॉर्ड खामगावचे उद्योजक विनोद डीडवनिया ,फॅमिली बिजनेस अवार्ड बद्री हलवाई, बेस्ट वुमन इंटरप्रेनर अवॉर्ड रजनी महल्ले तर फर्स्ट जनरेशन अवॉर्ड कार्तिक शाह यांना प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.तसेच सर्वोत्कृष्ट कार्यकारिणी सदस्य म्हणून राजकुमार राजपाल, उपसमिती सदस्य म्हणून रजनी महल्ले,
दिपाली देशपांडे यांना बहाल करण्यात आला.यावेळी ऑडिटर प्रशांत लोहिया, इव्हेंट संचालक अजय शर्मा, खंडेलवाल भवन अध्यक्ष ज्ञानप्रकाश खंडेलवाल तसेच चेंबरचे कर्मचारी गिरिराज लखोटिया ,मंगेश रघुवंशी, रेवत पळसपगार आदींनाही सन्मानित करण्यात आले.
अतिथींचे स्वागत चेंबरचे माजी अध्यक्ष अशोक गुप्ता, श्रीकिशन अग्रवाल वसंत बाच्छुका समवेत विविध संस्था संघटनांचे शैलेश खरोटे मनोज खंडेलवाल शांतीलाल भाला, शाम अग्रवाल, सुरज खंडेलवाल, सतीश भालचंदाने, विक्रम साऱ्यांची, कुंजबिहारी जाजू योगेश अग्रवाल, राजीव शर्मा, दिनेश पार्डीवाल, संदीप प्रणय कोठारी आदींनी स्वागत केले. आपल्या मार्गदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गिरधर गोपाल मुंदडा यांनी विदर्भ चेंबरने चालविलेल्या औद्योगिक सेवा कार्याची प्रशंसा करीत चेंबरने आपल्या कार्याच्या विस्ताराचे क्षेत्र अधिक जोमाने पसरवुन अन्य सेवा क्षेत्रातील सेवा करणाऱ्या सेवाव्रतीना ही समाविष्ट करून चेंबरचे दालन अधिक विस्तारित करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विदर्भ चेंबरच्या वार्षिक बुलेटिनचे थाटात विमोचन करण्यात आले. संचालन मानद सचिव निरव वोरा तर आभार सहसचिव निखिल अग्रवाल यांनी मानलेत. राष्ट्रगीताने आमसभेची सांगता करण्यात आली. वार्षिक आमसभेच्या सफलतेसाठी मनीष केडिया, चंचल भाटी, दिलीप खत्री, कमल खंडेलवाल, किरीट मंत्री, कृष्णा शर्मा, मनोज अग्रवाल, पंकज कोठारी, प्रमोद खंडेलवाल, राजकुमार शर्मा, सलीम डोडिया, श्रीकर सोमण, श्रीकांत गोयनका, सिद्धार्थ रूहाटीया समवेत समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.