अकोला दिव्य ऑनलाईन : अयोध्येत नवनिर्मित मंदिरात २२जानेवारीला पार पडलेल्या प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून त्यानंतर दर महिन्याच्या 22 तारखेला त्या सोहळ्याचे स्मरण आणि प्रभु श्रीरामाच्या नावाचा जयघोष कायम ठेवण्यासाठी सुंदरकांडचे आयोजन करण्यात येत आहे. बिर्ला राम मंदिरात सुंदरकांड होत असून ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या आयोजनाला भाविकांचा प्रतिसाद वाढत आहे.
राधेकृष्ण सुंदरकांड भजनी मंडळ, कैलास टेकडी सुंदरकांड व भजनी मंडळ, तपे हनुमान मंडल, लक्ष्मण सुंदरकांड मंडळ या भजनी मंडळांच्या सहकार्याने आयोजन होत आहे.अयोध्येत श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती. त्या दिवशी बिर्ला राममंदिरात 5000 मातृशक्ती बरोबर शाळकरी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एक लक्ष रामरक्षा पठण सोहळ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादानंतर दर महिन्याच्या 22 तारखेला याप्रमाणे मागील 6 महिन्यापासून सुंदरकांड सोहळा स्मरणीय ठेवण्यासाठी, राम भक्तांच्या आग्रहाखातर दर महिन्याला आयोजन केले जाते आहे.अशी माहिती निलेश देव यांनी दिली आहे.
सुंदरकांड साठी शहरातील नामांकित 21 सुंदरकांड भजनी मंडळी उपस्थित होतात. दर महिन्याच्या 22 तारखेला सकाळी ७ वाजता सुंदरकांड सुरु होऊन महाआरती संध्याकाळी ६.४५ होईल. अशी माहिती निलेश देव यांनी दिली आहे. रामभक्तांनी या सुंदरकांड आयोजनात सहभागी होत रामनामाचे स्मरण व उच्चारणात सहभाग नोंदवावा. जगात कुठेही नाही असा नवा विक्रम आणि आयोजन बिर्ला राम मंदिर करण्यात येत आहे. मागील महिन्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे, , जुन या महिन्यात अखंडित सेवेत अकोलेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या महिन्यातही आज शनिवार दि. 22 जून रोजी आयोजन करण्यात आले होते.