अकोला दिव्य ऑनलाईन : राष्ट्रीय महामार्गावर सुरुवातीपासून असलेल्या अकोला औद्योगिक वसाहतीत आजपर्यंत सरळ आणि सहजपणे आवागमनची सुविधा उपलब्ध होती. परंतु अलीकडे राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आल्याने रहदारीची नवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात एमआयडीसीमध्ये प्रवेशासाठी आणि बाहेर येण्यासाठी असलेला सरळ मार्ग अवरुद्ध झाला. विस्तारीकरण करताना सहजपणे प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा केली नसल्याने औद्योगिक वसाहतीमधिल प्रवेशासाठी रस्त्यावर दररोज तासनतास वाहतूकीचा खोळंबा होत आहे. अनेकदा दुचाकींचा अपघात होवून वाहनस्वारला किरकोळ दुखापती झाल्या आहेत. तेव्हा अप्पू पुतळ्यापासून असलेल्या प्रवेशाच्या केंद्रबिंदूपासुन फ्लॉय ओव्हर अर्थात उड्डाणपूल बांधण्यात यावे,अशी येथील उद्योजक, वाहतुकदारांची मागणी आहे.
अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल यांनी केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री ना.नितीन गडकरी यांना पत्र पाठवून ही समस्या तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे. ना. गडकरी यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात खंडेलवाल यांनी नमूद केले आहे की, फ्लायओव्हर हाच आता एकमेव पर्याय आहे.कारण एमआयडीसी लगत असलेल्या शिवर गावातून कामाला येणाऱ्या कर्मचारी आणि कामगारांना जीव धोक्यात घालून चौपदरीकरणाचा रस्ता ओलांडून एमआयडीसीत यावे लागते. पण फ्लायओव्हर हा धोका राहणार नाही.
अनेक वाहनधारकांना नाईलाजाने काही अंतर रॉंगसाईडने वाहनांना आणावे लागते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.यामुळे ट्रकचालक जास्त पैसाची मागणी करुन, वेळप्रसंगी वाद घालतात. याचा उत्पादन क्षमता और वेळेच्या नियोजनावर विपरीत परिणाम होत आहे. तेव्हा याकडे जातीने लक्ष घालून उड्डाणपूल बांधण्यासाठी तातडीने नियोजन करावे, अशी मागणी केली आहे.