Sunday, September 8, 2024
Homeताज्या घडामोडीविधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक ! १२ जुलैला मतदान व निकाल

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक ! १२ जुलैला मतदान व निकाल

अकोला दिव्य ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर जागांसाठी येत्या २७ जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. ११ सदस्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ येत्या २७ जुलैला संपत आहे त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

  • हे सदस्य निवृत्त होत आहेत.

1 डॉ. मनीषा कायंदे
2 विजय गिरकर
3 अब्दुल्ला खान दुर्रानी
4 निलय नाईक
5 अनिल परब
6 रमेश पाटील
7 रामराव पाटील
8 डॉ.वजहत मिर्झा
9 प्रज्ञा सातव
10 महादेव जानकर
11 जयंत पाटील

या ११ जणांचा विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ २७ जुलैला संपत आहे. तत्पूर्वी या जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. १२ जुलैला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

नोटिफिकेशन – २५ जून २०२४, मंगळवार
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २ जुलै २०२४ मंगळवार
उमेदवारांच्या अर्जाची छाननी – ३ जुलै २०२४, बुधवार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – ५ जुलै २०२४, शुक्रवार
मतदान – १२ जुलै २०२४, वेळ – सकाळी -९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मतमोजणीनिकाल – १२ जुलै २०२४, -संध्याकाळी ५ वाजता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!