Thursday, January 2, 2025
Homeराजकारणमहाविकास आघाडीला 6 जागांवर वंचित व एमआयएम मुळे फटका

महाविकास आघाडीला 6 जागांवर वंचित व एमआयएम मुळे फटका

अकोला दिव्य ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने अविस्मरणीय कामगिरी केली असून, लोकसभा 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला तब्बल 13 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडी अधिक जागा जिंकू शकले असते. मात्र अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएममुळे महाविकास आघाडीला 6 जागांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे अँड आंबेडकरांच्या वंचित व ओवेसींच्या एमआयएममुळे महाराष्ट्रातील भाजपला 6 जागा मिळाल्या आहेत. या जागांवर व्हीबीए आणि एआयएमआयएमला विजयाच्या फरकापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. यापैकी काँग्रेसच्या 1आणि उद्धव ठाकरेंच्या 5 जागांचा विजयाचे रूपांतर पराभवात करण्याचे काम केले गेले. नाहीतर महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप + 11 जागा कमी झाल्या असत्या. सहा जागांचे संपूर्ण गणित स्पष्ट करताना लक्षात येते की, अकोल्यात महाविकास आघाडीतील कॉंग्रेसला 4 लाख 16 हजार 404 मते मिळाली तर एनडीएतील भाजपला 4 लाख 57 हजार 30 आणि व्हीबीएला 2 लाख 76 हजार 747 मते मिळाली. महाविकास आघाडीतील कॉंग्रेसने ही जागा अवघ्या ४० हजार ६२६ मतांनी गमावली.


औरंगाबादच्या जागेवर महाविकास आघाडीतील ठाकरे यांच्या उमेदवारीला 2,93,450 मते मिळाली, भाजपला 4,76,130 तर ओवेसींच्या AIMIM ला 3,41,480 मते मिळाली. उद्वव ठाकरेंनी ही जागा 1,82,680 मतांनी गमावली. बुलडाण्याबद्दल बोललो तर येथे ठाकरे यांच्या उमेदवारीला 3,20,388 मते, एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारीला 3,49,867 मते मिळाली, तर अँड आंबेडकर यांच्या उमेदवारीला 98,441 मते मिळाली. महाविकास आघाडीनेही ही जागा अवघ्या 29 हजार 479 मतांनी गमावली. हातकणंगले, मुंबई उत्तर पश्चिम आणि पालघरच्या जागांवरही असेच गणित आहे. ‘इंडिया’ आघाडीने हातकणंगलेची जागा 13 हजार 426 मतांनी गमावली. या जागेवर ‘वंचित’ ला 32 हजार 696 मते मिळाली. सर्वात रोचक लढत मुंबई उत्तर पश्चिम जागेवर पाहायला मिळाली. उध्दव ठाकरे यांच्या उमेदवारीला मुंबई उत्तर पश्चिम जागेवर केवळ 48 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. येथून अँड आंबेडकरांच्या उमेदवाराला 10052 मते मिळाली. पालघरच्या जागेवर ‘इंडिया’ आघाडीचा १८३३०६ मतांनी पराभव झाला. येथून वंचित बहुजन आघाडीला तब्बल 2 लाख 54 हजार 517 मते मिळाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!