Friday, November 22, 2024
Homeसामाजिकप्रशांत प्रतिभा पुरस्कार ! सिंधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

प्रशांत प्रतिभा पुरस्कार ! सिंधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहरातील सिंधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वर्गीय प्रशांत हरीश अलीमचंदानी स्मृती ‘प्रशांत प्रतिभा पुरस्कार’ 2024 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा हॉटेल ग्रीनलँड कॉटेज येथे हरीशभाई अलीमचंदानी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि कनिष्का कावना यांच्या स्वागतपर नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाहक नरेंद्र देशपांडे, भाजपा शहराध्यक्ष जयंत मसने, कन्हैयालाल रंगवाणी, भारूमल मुलानी, शहर सिंधी समाज पंचायत अध्यक्ष रमेश जग्यासी, दादा शोभराज राजपाल, कृष्णा शर्मा, डॉ.अशोक ओळंबे, विनोद मनवानी, मनोहर पंजवाणी, भैरूमल वाधवाणी उपस्थित होते.

सिंधी समाजातील इयत्ता दहावी च्या सीबीएससी आणि स्टेट बोर्ड मधील गुणवंत विद्यार्थी तसेच इयत्ता बारावी मधील सर्व शाखेतील विद्यार्थी व समाजातील नवनिर्वाचित सीए, डॉक्टर, इंजिनिअर, वकिल, फॅशन डिझाइनर आणि आर्किटेक्टसह 180 विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी सीबीएससी मध्ये दक्ष नितीन नेभानी याने 97.60 टक्के गुण प्राप्त करून प्रथम स्थान प्राप्त केले. प्राची रवी कुमार वाधवानी हिने 96.80, वंश जमुनादास कटारिया यांनी 96.60 आणि सिमरन आनंद मनवाणी हिने 94.80 टक्के गुण प्राप्त करीत समाजाचे नावलौकिक केले.

स्टेट बोर्ड मध्ये जयंत मुकेश बालानी यांनी 97.40 टक्के गुण प्राप्त करून प्रथम स्थान प्राप्त केले, श्रुती मनीष आहूजा हिने 95.60 हंसिका राजेश मोटवानी यांनी 95.40 आणि भूमी सुनील गुरबानी हिने 95.20 टक्के गुण प्राप्त करून समाजात नावलौकिक मिळविला.

इयत्ता बारावीमध्ये इशिका रमेश कुमार रामनानी हे ने 95.67 टक्के गुण प्राप्त करून टॉप केले, दर्शना नानक मुलानी एम ए 95.33, भारत संजय कटारिया हिने 93 टक्के आणि नीव गिरीश गुरबानी यांनी 93 टक्के गुण प्राप्त केले. सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचा हरीशभाई आलिमचंदानी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र फोल्डर आणि वृक्ष लागवडीसाठी रोप देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक चंदू लड्डा, सुरेंद्र नागदेव, धीरज बसंत वाणी, प्रकाश आनंदानी, दीप मनवाणी, मुकेश आलिमचंदाणी, अरुण आलिमचंदाणी, हरीश कटारिया, सुनील जेसवाणी, प्रो. सुरेश लालवाणी, विनय लालवाणी, प्रकाश खबराणी, कोडुमल चावला, नवीन कृपलानी, अँड.रमेश रामनाणी, सुरेश जसवाणी, संजय मोतीयानी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता कांता आलिमचंदानी, आर्किटेक्ट मधुर आलिमचंदानी, डॉक्टर सुरेश केसवानी, गौतम वाधवानी, अँड.राजेश चावला, नरेश शोधणानी, अंकुश आहुजा, आशिष राजपाल, भावना भारती, शेखर भारती, ब्रह्मानंद वलेचा, गीता पंचवानी, गुड्डू धनवाणी, कन्हैया आहूजा, मनोहर केसवानी, प्राध्यापक मीरा आहुजा, जया कावणा, संजय आहूजा, मेघा राजपाल, पूजा केसवानी, नरेश बाशानी, सागर केसवाणी, पायल केसवानी, डॉक्टर प्रिया केसवानी, राजेश सोनी, संजय मोतीयानी, शुभम जसवानी, सुरेश चंदनानी, दिलीप जगमलानी, विशाल मनवाणी, भूमी सबलानी, पूजा अडवाणी, अमित थदानी यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची प्रस्तावना हरिशभाई आलिमचंदाणी यांनी तर संचालन ब्रह्मानंद वलेचा, गौतम वाधवाणी, नरेश शोधनानी, आशिष राजपाल आणि मेघा राजपाल यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मान्यवरांनी पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच पालक व सिंधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!