अकोला दिव्य ऑनलाईन : दिवसागणिक पर्यावरणाचे संतुलन ढासळत जाऊन, दरवर्षी वाढतच चालले तापमान निसर्गातील जीवजंतू आणि मानवाच्या जीवावर बेतले आहे. केवळ आणि केवळ वृक्षारोपण करुन पर्यावरणाचा समतोल केले तरच विनाशापासून काही प्रमाणात बचाव होऊ शकतो. काळाची ही गरज ओळखून श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाकडून वृक्षारोपण व वृक्ष रोप वाटप चळवळ सुरू केली आहे. आज माहेश्वरी समाजाचे आराध्य दैवत भगवान महेश यांच्या नवमी उत्सवानिमित्त स्व.डॉ.निकुंज अनूप कोठारी यांच्या स्मृति प्रित्यर्थ वृक्षारोपण आणि निशुल्क वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनुप कोठारी, प्रफुल्ल राठी आणि श्रीमतीजी साडीचे संचालक प्रकाश कोठारी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण तथा निःशुल्क वृक्ष वाटपाला सुरुवात केली.
या कार्यक्रमाच्या अंतर्गत मारवाडी प्रेस, गुजराती देवी मंदिर, स्वावलंबी विद्यालय, बी.आर हायस्कूल, निशू नर्सरी व कोठारी काॅंव्हेंट, श्री.गंगा माता मंदिर, श्री.सालासर बालाजी मंदिर, गंगा नगर, रघुवंशी मंगल कार्यालय बाळापूर रोड, श्री निलकंठेश्वर महादेव मंदिर शांता नगर बाळापूर रोड, श्री.रामदेवबाबा श्री.शामबाबा मंदिर गीता नगर इत्यादी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष शरद चांडक, ब्रजेश तापडिया, भूपेंद्र तिवारी, अनिल तापडिया, आर्कि. अमित राठी, सुशांत राठी, लुनकरण मालाणी, मनोज लढ्ढा, गोविंद लढ्ढा, पंकज तापडिया, शैलेश तिवारी, अशोक तापडिया, संजय खेतान, केशव खटोड, नितीन चांडक, जगमोहन तापडिया, नंदकिशोर बाहेती, आर्कि.पवन बंग, अजय सारडा, नितीन जाजू, विश्वनाथ शर्मा, प्रभु मोरे, विठ्ठल महल्ले, विलास मोरे, राम बाणाईत, राजेश खेडकर, अतुल गाडगे आणि सदस्य उपस्थित होते.