अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहरातून जाणाऱ्या मोर्णा व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून वाहणा-या विद्रुपा नदीकाठावरील रहिवाश्यांच्या मालमत्ता आणि प्राणहानीचे नुकसान टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून मोर्णा व विद्रुपा नदीकाठावरील नागरीवस्तीला ब्ल्यू, व रेड लाईन मध्ये समाविष्ट केले आहे. यामुळे हे क्षेत्र रिकामे करणे आवश्यक आहे. मात्र पाटबंधारे विभागाकडून चुकीचे सर्वेक्षण आणि मार्किंग केली गेल्याने मनपामध्ये नकाशाला मंजूरी मिळवीण्यात अडचणी येत आहे. ही अडचण दूर करण्यास्तव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने विविध मोर्चे, आंदोलने करून अखेर ३१ मे रोजी पाटबंधारे विभागाच्या विभागीय कार्यालयात आंदोलन केले. तेव्हा पाटबंधारे विभागाकडून १० जून पासून नव्याने ब्ल्यू व रेड लाईन मार्किंग करण्याचे काम सुरु केले गेले. मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी स्थगनादेश मिळाल्याची बातमी प्रकाशित करून घेतली. तेव्हा राजेश मिश्रा व सहकाऱ्यांनी चौकशी केली असता, असा कुठलाही आदेश शासनाने काढला नाही. असे स्पष्ट झाले.मग फुकाचे श्रेय घेण्या-या जनप्रतिनिधीने अकोलेकरांची दिशाभूल करण्यापेक्षा तात्काळ स्थगनादेश आणावा,असे आवाहन शिवसेना उबाठा पक्षाचे शहराध्यक्ष राजेश मिश्रा यांनी केले येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी स्थगनादेश मिळाला नाही तर अधिवेशन काळात नागरिक मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा वार्ताहर बैठकीत दिला.
पाटबंधारे विभागाने कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमार्फत ब्ल्यू, रेड लाईन सर्वेक्षण केले होते. मात्र ते चुकीचे असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने वेळोवेळी आंदोलने केली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वसूलकर यांनी चूक झाल्याचे मान्य करून तसे आंदोलकांना लेखी दिले. याच विषयावर राज्य पातळीवर अधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेतला. असे असतानाही सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधीने कोणतीही शहानिशा केली नाही आणि सरळ स्थगनादेश मिळाल्याचे सोशल मीडिया, प्रसार माध्यमाद्वारे सांगितले. हा प्रकार श्रेय लाटण्याचा आहे.असा आरोप मिश्रा यांनी केला.
या प्रकरणात सत्तधारी पक्षाचा एका प्रतिनिधीने पाठपूरावा केल्याचे राजेश मिश्रा यांनी मान्य केले आहे. मात्र त्याच पक्षाचा दुसऱ्या प्रतिनिधीचे कोणतेही योगदान नसतानाही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत अकोला शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासोबत उप जिल्हा प्रमुख गजानन बोराळे, पूर्व शहर संघटक तरुण बगेरे, पश्चिम शहर संघटक अनील परचुरे, उप शहर प्रमुख शरद तुरकर, संजय अग्रवाल, विभाग प्रमुख विश्वासराव शिरसाठ, रवी मडावी, प्रसिद्ध प्रमुख योगेश गिते, सोशल मीडिया प्रमुख चेतन मारवाल उपस्थित होते.