अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार अनुप संजय धोत्रे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन अकोला जिल्हा खाद्यपेय विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल व पदाधिकाऱ्यांकडून ह्र्दय सत्कार करण्यात आला. मंचावर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, सचिव दीपक वोरा, उपाध्यक्ष कृष्णकुमार राठी, ओमप्रकाश गोयनका, जसपाल सिंग नागरा आणि किरण भाई शहा विराजमान होते. प्रास्ताविकात खाद्यपेय विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी प्रास्ताविकात हॉटेल व्यवसायीकांना येणाऱ्या अडचणीचा ऊहापोह करताना सांगितले की, खासदार अनुप धोत्रे उच्च शिक्षित असल्याने अकोला शहराच्या विकासाकडे त्यांचं लक्ष आहे. यासोबतच हॉटेल व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्यांच्यातर्फे करण्यात येतील असा विश्वास यावेळी योगेश अग्रवाल यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना अनुप धोत्रे म्हणाले की, यापुढे लोकसभा मतदारसंघात विकासाच राजकारण केलं जाईल. सामान्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न असेल. शहराला विमान सेवेने जोडल्या जाईल. सोबतच इंदूर ते अकोला अशी कनेक्टिव्हिटी द्यायचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून अकोल्यातील व्यवसाय वाढीकरिता फायदा होईल. अकोल्यामध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढेल आणि पर्यायाने हॉटेल उद्योगाला चालना मिळेल असे धोत्रे म्हणाले. सोबतच अकोला जिल्हा खाद्यपेय विक्रेता असोसिएशनला पूर्ण सहकार्य असेल. हॉटेल व्यवसायीकांना कुठल्याही प्रकारची व काहीही अडचण आल्यास त्या निदर्शनास आणून दिल्यास, त्याची वेळीच दखल घेऊन त्या अडचणी वा समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेल.अशी ग्वाही खा. धोत्रे दिली.
यावेळी नरेंद्र अग्रवाल, दीपक गोयंका, कृष्णकुमार राठी, महेश शर्मा पंकज देशमुख, भूषण मेहता, अमोल अग्रवाल, श्रीकांत पिंजरकर, जितू अग्रवाल, किशोर गुजराती, श्रीराम पांडे, नीरज आवंडेकर, शैलेश खत्री, हिमांशू अग्रवाल, अमर कुकरेजा, शिव खत्री,ईश्वर जैन मदन जैन, हेमेंद्र अग्रवाल, सचिन अग्रवाल, जय अग्रवाल, रिषभ जैन, अशोक वानखडे, राजेश डोंगरकर, संजय सिसोदिया, सोनल ठक्कर, भावेश खिलोसिया यांच्यासह अकोला शहरातील हॉटेल व्यवसाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.