Saturday, November 23, 2024
Homeराजकारणमोदींनी महाराष्ट्रातील 23 उमेदवारांसाठी घेतल्या 18 सभा : मात्र 5 उमेदवार विजयी...

मोदींनी महाराष्ट्रातील 23 उमेदवारांसाठी घेतल्या 18 सभा : मात्र 5 उमेदवार विजयी !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बहुप्रतीक्षित १८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काल मंगळवार ४ जून जाहीर झाला. देशात आणि महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपाने यावेळी ४०० जागा जिंकू असा दावा केला होता. मात्र त्यांना २५० जागा देखील जिंकता आल्या नाहीत. तर महाराष्ट्रात महायुतीने ४५ हून अधिक जागा जिंकू असा दावा केला होता. मात्र महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पदरात केवळ १७ जागा टाकल्या तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील महायुतीच्या अपयशाचं खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या डोक्यावर फोडलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात अनेक दौरे केले होते. मात्र यातून त्यांच्या हाती फारसं काही लागलेलं दिसत नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या ज्या २३ उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या, त्यापैकी बहुसंख्य उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या २३ उमेदवारांसाठी मोदी यांनी १८ सभा घेतल्या होत्या, तसेच एक रोड शो केला होता. मात्र या २३ पैकी १८ उमेदवार पराभूत झाले आहेत. तर केवळ ५ उमेदवार विजयी झाले आहेत.

बारामती – सुनेत्रा पवार (अजित पवार गट) पराभूत – शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे १० हजार मतांनी आघाडीवर आहेत.
धाराशिव – अर्चना पाटील (भाजपा) पराभूत – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर मोठा मताधिक्याने विजयी झाले आहेत.
लातूर – सुधाकर श्रृंगारे (भाजपा) पराभूत – काँग्रेसचे शिवाजी काळगे विजयी
बीड – पंकजा मुंडे (भाजपा) पराभूत – राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे विजयी
अहमदनगर – सुजय विखे पाटील (भाजपा) पराभूत, शरद पवार गटाचे निलेश लंके विजयी.
नंदुरबार – हिना गावित (भाजपा) पराभूत – काँग्रेसचे गोवाळ पाडवी विजयी
दिंडोरी – भारती पवार (भाजपा) पराभूत – शरद पवार गटाचे भास्कर भगरे विजयी
कल्याण – श्रीकांत शिंदे (शिंदे गट) विजयी – ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर पराभूत.

यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील महायुतीच्या सहा उमेदवारांसाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर संयुक्त सभा घेतली होती. तसेच मुंबईत रोड शो देखील केला होता. मात्र मुंबीतील सहा पैकी चार मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले आहेत. तर केवळ दोन मतदारसंघांमध्ये महायुतीला विजय मिळवता आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!