Saturday, December 21, 2024
HomeUncategorizedएकनाथ खडसेंच्या भाजपालाच कानपिचक्या ! म्हणाले, फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका…!

एकनाथ खडसेंच्या भाजपालाच कानपिचक्या ! म्हणाले, फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका…!

भाजपामध्ये प्रवेशाचा मानस उघडपणे बोलून दाखवणारे एकनाथ खडसे यांनी भाजपालाच कानपिचक्या दिल्या आहेत. भाजपाला राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसल्याचं विधान एकनाथ खडसेंनी केलं आहे.

भाजपाला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आहे का? अशी विचारणा केली असता एकनाथ खडसेंनी त्यावर होकारार्थी प्रतिक्रिया दिली. “नक्कीच. महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण झालंय, त्याचा फटका भाजपाला बसताना दिसतोय. राज्यभरात फोडाफोडीचं राजकारण मतदारांनी अमान्य केलं आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतला. उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंकडे गेला. मूळ पक्ष ज्यांचा आहे, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले, त्यांच्या हातून ते इतरांच्या हातात जाणं या फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

या प्रकारांमुळेच अजित पवारांना या निवडणुकीत फारसा प्रतिसाद दिसत नाहीये. एकनाथ शिंदेंनाही फारसा प्रतिसाद दिसत नाहीये. उद्धव ठाकरेंचा पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा राहील. शरद पवारांच्या १० पैकी ८ किंवा ६ जागा जिंकून येतील असं एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे”, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी भाजपाबरोबरच अजित पवार गट व एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केलं.

काय आहे महाराष्ट्राच्या एक्झिट पोलमध्ये?

महाराष्ट्रातील एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार महाविकास आघाडी व महायुती यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल. त्यात महायुतीनं ४० हून अधिक जागांचे दावे केले होते. अजूनही त्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी महायुतीला ३८ ते ४१ जागा मिळतील, हा दावा कायम ठेवला आहे. मात्र, एक्झिट पोलमध्ये महायुतीला २२ ते २५ जागा मिळतील, असे अंदाज समोर आले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं हे अपयश असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!