Wednesday, January 15, 2025
Homeअपघातमहामार्गावर दुचाकी व एसटी बसच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी

महामार्गावर दुचाकी व एसटी बसच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्यात सर्वत्रच अपघाताच्या घटना घडत असून अकोला शहर व जिल्ह्यातही अपघाताची मालिका सुरूच आहे. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज शुक्रवार ३१ मे रोजी रात्री एसटी बस आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात नवरा बायको गंभीर जखमी झाले.जखमींना तातडीने रुग्णवाहिका द्वारा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील सात मैल जवळ असलेल्या दार्जिलिंग टी कंपनी या चहा कारखान्याजवळ रात्रीला MH 14 BT 4354 या क्रमांकाची एसटी बस आणि MH 30 AAP 4306 क्रमांकाची दुचाकी या दोन वाहनांची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात म्हैसपुर येथील मनोहर इंगळे व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमींना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळचा पंचनामा करून, अपघाताची तक्रार दाखल करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!