अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेच्या निकालामध्ये अकोला रामदास पेठ येथील सन्मित्र पब्लिक स्कूलचा निकाल यंदा देखील शंभर टक्के लागला असून शाळेने सतत सहाव्या वर्षी गुणवत्तापूर्ण शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे .
सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत वैयक्तिकरित्या उत्कृष्ट गुण संपादित केले. यावर्षी मात्र या आधीचे मुलींच्या गुणवत्ता यादीचा विक्रम मोडीत मुलांनी गुणवत्ता यादीत अव्वल राहण्याचा मान मिळवला आहे. यामध्ये स्वराज मुरूमकर याने ९५ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक आदित्य पांढरकर (९२.८०) तृतीय क्रमांक पीयुष नावकार (९२.६०) चतुर्थ क्रमांक गौरी चौबे (९२.४०) आणि पाचवा क्रमांक प्रसन्न कोरपे (९२.२०) याने पटकावला आहे.
यासोबतच धृवी सोनी (९२) अंकिता शिरसाट (८९.८०) आर्यन ठाकरे (८९.६०) मंजिरी गिऱ्हे (८९.२०) प्रशिस इंगळे (८८.८०) मंजिरी मोरे (८८) पूनम जयस्वाल (८७.६०) हर्षा डिडवाणी (८६.६०) राम इंगोले (८६.२०) आयुष मुंडे (८६.२०) हर्षद भोकरे (८६.२०) सेजल तिरपुडे (८५.६०) पियुष अवारे (८५.४०) रिया भारती (८५) सोहम बानटकर (८४.६०) रिशा भारती (८३.६०) स्नेहल ओहेकर (८३.२०) फाल्गुनी मेंडे (८२.६०) कुलदीप यादव (८२.४०) कुणाल डुकरे (८१.४०),साई पाताळवंशी (८१.२०) मंथन केशवार (८०.६०) सूर्या जयराम (७८) श्रवण धरमठोक (७६.२०) प्रतिक्षा भालेराव (७६) आणि सर्वज्ञ लोड (७४.६०) गुण घेऊन शाळेचे एकुण ३१ विद्यार्थी डिस्टिंक्शन ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
तर सात विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विषयवार निकालामध्ये इंग्रजी भाषेत सर्वोत्तम ध्रुवी सोनी ८९ गुण, हिंदी संस्कृत संयुक्त भाषेत सर्वोत्तम स्वराज मुरूमकर ९६ गुण,मराठी भाषेत सर्वोत्तम अंकिता शिरसाट ९४ गुण, गणितामध्ये सर्वोत्तम पीयुष नावकार, आदित्य पांढरकर ९६ गुण, विज्ञानामध्ये सर्वोत्तम आदित्य पांढरकर, स्वराज मुरूमकर,पीयुष नावकार ९४ गुण आणि सामाजिक शास्त्रात स्वराज मुरूमकर ९३ गुण घेऊन अव्वल राहिले आहेत.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल पालकांनी संस्थेचे कौतुक करुन गुरुजनांचे आभार व्यक्त केले.
प्राचार्या मनीषा राजपूत यांच्या कुशल नेतृत्वात वर्षभर राबविले जाणारे विविध शालेय उपक्रम ,सराव परीक्षा, वेळोवेळी मार्गदर्शन व नियोजन याचा परिपाक म्हणजे विद्यार्थ्यांना यशाची परंपरा सतत कायम राखता आली. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सिंह राजपूत यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राचार्यां राजपूत यांचे कौतुक व अभिनंदन केले. याप्रमाणे सर्वच क्षेत्रामधे यशाची परंपरा कायम राखावी अशा शुभेच्छा दिल्यात. प्राचार्या मनिषा राजपूत यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.