Monday, December 30, 2024
Homeशैक्षणिकआवाहन ! राज्याचा नवा शालेय अभ्यासक्रम खटकतोय ? तर, ३ जून पर्यंत...

आवाहन ! राज्याचा नवा शालेय अभ्यासक्रम खटकतोय ? तर, ३ जून पर्यंत आक्षेप नोंदवा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या पायाभूत अभ्यासक्रम आराखड्यानुसार पायाभूत आराखडा तयार करीत तो प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राच्या गरजा, वैशिष्ट्ये व सद्यस्थिती विचारात घेऊन तिसरी ते बारावी इयत्तेपर्यंतचा अभ्यासक्रम असल्याचा दावा सरकारने केला आहे.प्रस्तावित अभ्यासक्रमाचा मसुदा २३ मे रोजी जनतेच्या प्रतिक्रियासाठी खुला करण्यात आला आहे. त्यावर सर्व समाज घटकांनी आपले अभिप्राय ३ जून पर्यंत नोंदवायचे आहेत. पोस्टाने पाठवू शकता किंवा लिंक उपलब्ध असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.

अभिप्राय नोंदवित असतांना त्यात आपले नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल, पत्ता, कार्यालय आदी तपशील अपेक्षित आहे. अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात. क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसुद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या मुद्द्यात दुरुस्ती आवश्यक वाटते त्याचा तपशील, सुधारित मजकूर कसा असावा याचा समावेश असावा.पोस्टाने अभिप्राय पाठवायचा असल्यास त्यावर एससीएफ – एस इ राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ बाबत अभिप्राय असे ठळक अक्षरांत लिहून तो परिषदेच्या पूणे येथील ७०८ सदाशिव पेठ कुमठेकर मार्ग या पत्त्यावर पाठविण्याची सूचना आहे.

आराखडा तयार करण्यासाठी विविध शालेय विषय व त्या सोबतच आंतर विद्याशाखीय विषय तसेच असे विषय की जे सर्वच विषयातून शिकविले जावेत. अश्या सर्वच घटकंचा विचार करुन एकूण अकरा गटात तज्ञाच्या सहाय्याने त्या त्या गटाचा अभ्यासक्रम आराखडा तयार केला गेला. गरजे नुसार कार्यशाळा घेऊन तो बारकाईने तयार करण्यात आल्याची भूमिका परिषदेने मांडली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब पडावे म्हणून हा आराखडा जनते समोर ठेवून तज्ञाच्या सूचना मागविण्यात आल्या. या सर्व सूचनांचे विश्लेषण करुन त्याचे यथायोग्य ठिकाणी समावेशन करण्यात आले, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!