अकोला दिव्य न्युज ब्युरो : सतत वाढत चाललेल्या तापमानापासून सर्वसामान्य लोकांना आरोग्य रक्षणासाठी रोगनिदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व श्री विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.राजपुतपुरा येथे आयोजित रोगनिदान व औषधोपचार शिबिराचे औपचारिक उद्घाटन साहित्यीक डॉ. रामप्रकाश वर्मा व डॉ. जयप्रकाश जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे आयोजन संजय गोटफोडे यांनी केले.
या शिबिरात राजपूतपुरा, खोलेश्वर, राधाकिसन प्लॉट, देवरावबाबा चाळ येथील शेकडो लोकांनी सहभाग घेऊन तपासणी करून घेतली. यावेळी सहभागी लोकांना उन्हापासून बचावाकरीता ‘सनकुल’ औषधीचे मोफत वाटप करण्यात आले.
या शिबिरासाठी मनोज साहू व अँड अनिल शुक्ला डॉ हेमलता लढ्ढा, डॉ शाकीब, डॉ. रुची चौरसिया, डॉ हर्षल कोल्हे, डॉ वैशाली डोसे यांच्या मार्गदर्शनात डॉ.खुशी साहू, डॉ.हर्षल थोरात, डॉ.मकरंद माणिकपूरे, डॉ.श्रावणी महल्ले, डॉ.आकांशा अवतडे, डॉ.राजेश्वरी तायडे, डॉ.हर्षदा सोनटक्के, डॉ रिटा जसमतिया, डॉ शैलेंद्र मिश्रा, डॉ.तुषार सोनुने, डॉ.प्रणय भगत यांनी सहकार्य केले.
शिबिरात ॲड.कल्पना गोटफोडे,आशा साहू, विनोदसिंग ठाकूर, रोहित वाघमारे, निखिल राऊत, जय गोटफोडे, पुथ्वीराज राजपूत, सतीश शुक्ला, राहुल राऊत, बबलू जयराज, संतोष किरणापुरे, करन साहू, निलेश किरणापुरे, सतीश यादव, लाला जोगी, नितेश पाली, महेश गोंधळेकर, विक्रम बने, सुगध गवई, डॉ कपिल लढ्ढा, देवा अहिर, तुषार कांतेकर, निखिल बुंदेले, वैदेही गोटफोडे उपस्थित होते.