Wednesday, January 15, 2025
Homeसामाजिकविदर्भ विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष थोरात तर सचिवपदी डॉ. श्रीराम...

विदर्भ विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष थोरात तर सचिवपदी डॉ. श्रीराम लाहोळे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी अकोला येथील नेत्रतज्ञ डॉ. शिरीष थोरात तर अकोला येथील नेत्रतज्ञ डॉ.श्रीराम लाहोळे यांची सचिव पदावर निवड करण्यात आली. अमरावती येथे नुकतीच विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत सर्वानुमाने ही निवड करण्यात आली. या प्रसंगी प्रामुख्याने सभेला उपस्थित राहिलेले हैद्राबाद येथील नेत्रतज्ञ डॉ.संतोष होनावर यांच्या हस्ते डॉ. थोरात आणि दिल्ली येथील नेत्रतज्ञ डॉ.नम्रता शर्मा यांच्या हस्ते डॉ लाहोळे यांना पदाचे नियुक्तीपत्र व पदक बहाल करण्यात आले.

नेत्रदानाच्या क्षेत्रात सोसायटीचे कार्य अतिशय मोलाचे असून अतीदुर्गम भागातील मुलांना नेत्रसेवा देण्याचे काम सातत्याने केले जाते. नेत्रदान शिबीर, नेत्रदान, काचबिंदु या सारख्या आजारावर जनजागृती कार्यक्रम, गोरगरीब रुग्णांना नेत्र रोगांवरील औषधांचे मोफत वाटप आदि कार्यक्रम नियमितपणे राबविल्या जाते.
या सभेत अकोला नॅबचे उपाध्यक्ष डॉ. नितिन उपाध्ये, डॉ.अभिजित वैद्य, डॉ.प्रशांत अग्नीहोत्री, डॉ.करंदीकर, डॉ पांगारकर, डॉ.प्रशांत बावनकुळे, डॉ.अरोरा, डॉ.राजेश जोशी, डॉ.प्रविण व्यवहारे, डॉ.सोनी, डॉ. मालपाणी, डॉ.सुरज उनडकाट, डॉ.अनुराधा राठोड, डॉ.स्मिता कोरडे, डॉ वंदना सिंगी, डॉ. चिंचोले, डॉ.बाहेकर, डॉ.शेळके, डॉ.राठोड, डॉ.पुरोहीत, डॉ.पाटील, डॉ.बोपी, डॉ. दळणकार, डॉ.भगत, डॉ.सागर भुईभार, डॉ.गुरुदासाणी, डॉ.निशांत राठी, डॉ.निलावार, डॉ दुर्गेश चोले, डॉ. जीमकाटे, डॉ. निलेश जैन, डॉ. मनीष तोटे, डॉ सुनील अग्रवाल, डॉ.पंकज लांडे, डॉ.राहुल तिवारी, डॉ.शमीक मोकदम, डॉ.जयपुरी, डॉ हुसैन, डॉ. विश्वकर्मा, डॉ.राजपुत, डॉ.उमेश रेवणवार, डॉ. निलेश वानखडेसह विदर्भातील इतरही नेत्रतज्ञ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!