Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीअकोल्यातील कुस्तीपटू प्रशिक्षकाकडून मुलीचा विनयभंग ! आराेपीस अटक, न्यायालयीन काेठडी

अकोल्यातील कुस्तीपटू प्रशिक्षकाकडून मुलीचा विनयभंग ! आराेपीस अटक, न्यायालयीन काेठडी

Akola crime: अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकाेला जुने शहरातील रहीवासी तसेच कुस्तीपटू व प्रशिक्षक असलेल्या बाळू धुर्वे याने त्याचीच शिष्य असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी समाेर आली. या प्रकरणी जुने शहर पाेलिसांनी गुन्हा दाखल करून आराेपीस अटक केली. त्याला न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने आराेपीची कारागृहात रवानगी केली.

जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी कुस्तीपटू प्रशिक्षक आरोपी धूर्वे याच्याकडे कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात होती. मात्र, दाेन वर्षांपासून तिने प्रशिक्षण बंद केले होते. दाेन दिवसांपुर्वी मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या नातेवाईकांनी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. यावरुन पाेलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. जुने शहरपोलिस या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा शोध लावला असता आरोपी प्रशिक्षक बाळू धूर्वे समाेर आला.

त्यानंतर जुने शहर पोलिसांनी अटक केली. मुलगी अल्पवयीन असल्याने जुने शहर पोलिसांनी ३६६, ३५४(अ), ३५४(ड) पोस्को अधिनियमानुसार कलमात वाढ केली. त्यानंतर आराेपीस अटक करून न्यायालयासमाेर हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!