अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील कॅटर्रस व्यवसायीक व माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व अशोक बालकिसन भुतडा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६४ वर्षे होते. त्यांच्या मागे पत्नी, अमीत, आलोक आणि प्रतिक ही तीन मुले, सूना आणि नात नातवंडांसह मोठे आप्त परिवार आहे. अकोला माहेश्वरी समाजातील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित असलेले अशोक भुतडा यांनी माहेश्वरी प्रगती मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. माहेश्वरी प्रगती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य सदैव लक्षात राहील. समाजातील प्रत्येक कार्य व आयोजनात हिरीरीने सहभागी होऊन योगदान देणारे भुतडा यांनी अकोला माहेश्वरी समाज ट्रस्टचे विश्वस्तपद देखील विभुषीत केले.
श्री मारवाडी प्रेस गणोशोत्सव मंडळाच्या आधारस्तंभापैकी एक असलेले भुतडा आपल्या सदैव हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे सर्वांसोबत घरोप्याचे संबंध होते. कॅटरिंग व्यवसायात अल्पावधीत त्यांनी माहेश्वरी समाजासह इतर समाजबांधवांसोबत शेवटपर्यंत जिव्हाळा जोपासला होता. विशेष म्हणजे ‘दिवाळीचा फराळ’ करीता ते ख्यातनाम होते. काही दिवसांनी प्रकृतीची कुरबुर सुरू असतानाही ते सक्रिय होते. काल अचानक अस्वस्थ वाटले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
आज शुक्रवार १७ मे २०२४ रोजी खोलेश्वर येथील लब्धि विहार अपार्टमेंट येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानावरुन दुपारी ५ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. मोहता मिल मोक्षधाम येथे त्यांचा पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.