Wednesday, January 15, 2025
Homeगुन्हेगारीअकोल्यात इन्कमटॅक्सची रेड ! अशोकराज आंगडियामध्ये कार्यवाही सुरूच : अनेक बड्या उद्योगपतींचे...

अकोल्यात इन्कमटॅक्सची रेड ! अशोकराज आंगडियामध्ये कार्यवाही सुरूच : अनेक बड्या उद्योगपतींचे धाबे दणाणले

income-tax-department-raid: अकोला दिव्य न्युज ब्युरो : नांदेड येथील व्यापारी आणि उद्योजक भंडारी यांच्याकडे 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांतच नागपूर आयकर विभागाने अकोल्यातील अशोकराज आंगडियावर छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील काही बड्या उद्योगपतींचे यामुळे धाबे दणाणले असून, हवाल्यातील देवाण-घेवाणसाठी हे नाव नेहमीच चर्चेत असते. अकोला शहरातील अशोकराज आंगडीया सर्विसवर पहाटे टाकण्यात आलेल्या छाप्याचे तार मराठवाडा आणि पुर्व विदर्भ व मध्य प्रदेशाशी संबधीत व्यवहारात जुळले आहे. अशोकराज आंगडिया सर्विसचे संचालक निमेश ठक्कर असल्याचे कळते

नांदेड येथील भंडारी फायनान्स कंपनीकडे टाकलेल्या छाप्यात पकडलेला मुद्देमाल मोजण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना 72 तास लागले होते. या दरम्यान येथील आदित्यनाथ पत संस्थेवरही छापा टाकून कारवाई करण्यात येतं आहे.या दोन छाप्यात मिळालेल्या कागदपत्रांची तपासणी असताना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्यानंतर अकोल्यातील अशोकराज आंगडियावर छापा टाकून कारवाई करण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठक्कर यांनी अनेक राज्यातील काही दिवाळखोर उद्योजकांचे विक्रीत निघालेले कारखाने विकत घेतले आहे. मात्र या व्यवहारात ठक्कर एकटे नाहीत. इतर अनेकांचा सहभाग असल्याचे संकेत मिळत आहेत. अचानक मारण्यात आलेल्या छाप्यामुळे बड्या उद्योगपतींचे धाबे दणाणले असून काहींनी तडकाफडकी आपल्या जवळील कागदपत्रांची सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट लावली आहे.या कारवाईत नेमक काय आढळून आलं आहे, याची वृत्त लिहेस्तोवर माहिती मिळाली नसून आयकर विभागातर्फे कारवाई अद्यापही सुरूच आहे.

नागपूर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी मोहीम सूरू आहे. दरम्यान आयकर विभागाची दरवर्षी तपासणी मोहीम सुरू असते, मागीलवर्षी देखील काही उद्योजक व्यापारी तसेच कोचिंग क्लासेसवर देखील तपासणी केली होती.

तपासणी मोहिमेनंतर काही त्रुटी आढळल्या तर त्यांच्यावर कारवाई केल्या जाते. अशातच आजच्या आंगडीया कुरियर सर्व्हिसवर तपासणी सुरू असून काही त्रुटी आढल्यास पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत बारकाईने बंद दाराआड ही तपासणी सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!