Saturday, November 23, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी ! भाजपला 233 जागा तर एनडीएला 268 : महाराष्ट्रात...

मोठी बातमी ! भाजपला 233 जागा तर एनडीएला 268 : महाराष्ट्रात NDA ला 20 जागांचा फटका ; योगेंद्र यादव यांचं भाकित

अकोला दिव्य न्युज ब्युरो : yogendra yadav prediction on bjp : सध्याच्या लोकसभा निवडणुकीच विश्लेषण करीत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला किंवा एनडीए अर्थात नॅशनल डेमोक्रॅटिक अलांयंसला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या निवडणुकीत किती जागा मिळाल्या आणि या निवडणुकीत त्यांची कामगिरी कशी राहील? यासंदर्भात योगेन्द्र यादव यांनी भाकित वर्तवलं असून, याबाबत पोस्ट केलेल्या व्हिडिओत सविस्तर विश्लेषण केले आहे.

एनडीएला स्पष्ट बहुमत नाही ?
भाजपप्रमाणे संपूर्ण एनडीएही बहुमताच्या जादुई आकड्यांपेक्षा कमी कामगिरी करू शकेल, असं योगेंद्र यादव यांचं मत आहे. भाजपाला बहुमत मिळणार नाही. भाजपा २७२ जागांच्या खूप खाली आहे. एनडीएही २७२ जागांच्या जादुई आकड्यांपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे, असं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगत आहेत.२०१९ला भाजपाला ३०३ जागा मिळाल्या, एनडीएला ३५३ मिळाल्या. मात्र, यंदा या जागांमध्ये तब्बल ९० ते १०० जागांची घट होईल, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे. तसेच, भाजपा ४०० पार जागा मिळवेल, हा अपप्रचार असून मतदारांनी त्याला बळी पडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

काय आहे योगेंद्र यादव यांचं गणित?
योगेंद्र यादव यांच्या राज्यनिहाय विश्लेषणात कर्नाटकमध्ये २८ लोकसभा जागांपैकी २६ एनडीएकडे आहेत. पण तिथे किमान १० जागांचं नुकसान होईल. राजस्थान आणि गुजरातमध्ये मिळून ५१ पैकी ५१ जागा एनडीएकडे आहेत. पण दोन्ही राज्यांमध्ये मिळून किमान १० जागांवर एनडीएचं नुकसान होईल, असं योगेंद्र यादव म्हणाले.

महाराष्ट्रात किती जागा मिळणार ?
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत. त्यामुळे राज्यात नेमकं काय चित्र असेल? याविषयी अनेकांच्या मनात तर्क-वितर्क चालू आहेत. महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ जागा एनडीएकडे आहेत. पण येथे किमान २० जागा एनडीए गमावेल, असं भाकित योगेंद्र यादव यांनी वर्तवलं आहे.

हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली या सगळ्या राज्यांत मिळून एनडीएचं किमान १० जागांचं नुकसान होईल, तर छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेश मिळून १० जागांचं नुकसान होईल, असं गणित यादव यांनी मांडलं आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड मिळून ६९ जागा एनडीएकडे आहेत. पण त्यात किमान १५ जागा एनडीए गमावेल. शिवाय, बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागांवर एनडीए आहे. पण तिथेही एनडीएचं किमान १५ जागांचं नुकसान होईल. पूर्वेकडे पश्चिम बंगाल, पूर्ण नॉर्थ-इस्ट आणि इतर केंद्रशासित प्रदेश मिळून किमान १० जागांचं एनडीएचं नुकसान होईल, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून वर्तवला आहे.

भाजपाचं एकूण ७५ जागांचं नुकसान !
दरम्यान, या सर्व राज्यांमध्ये मिळून भारतीय जनता पक्षाला एकूण ७५ जागांचा फटका बसू शकतो, असं योगेंद्र यादव यांना वाटतंय. तर मित्रपक्षांसह एनडीएच्या तब्बल १०० जागा कमी होऊ शकतील, असं ते म्हणाले.या सर्व आकडेमोडीच्या पार्श्वभूमीवर आजच्या स्थितीनुसार भाजपाला २३३ जागा मिळतील. अर्थात, सध्या हातात असलेल्या ३०३ जागांमधल्या ७० जागांचं नुकसान. तर मित्रपक्षांना आजच्या हिशेबाने ३५ जागा मिळतील. त्यामुळे एनडीएला साधारण २६८ जागा मिळू शकतील. त्यामुळे संपूर्ण एनडीएला आजच्या स्थितीत तरी किमान बहुमत मिळणार नाही, असं ते म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!