Wednesday, January 15, 2025
Homeगुन्हेगारीराजकीय पाठबळानेच 17 निष्पाप लोकांचा बळी ! झाडांवर विषप्रयोग : 'त्या' होर्डिंगची...

राजकीय पाठबळानेच 17 निष्पाप लोकांचा बळी ! झाडांवर विषप्रयोग : ‘त्या’ होर्डिंगची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

अकोला दिव्य : एस. रणशेवरे यांजकडून : मुंबई पूर्व नगरातील घाटकोपरमध्ये काल सोमवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कोसळलेल्या होर्डिंगने १४ जणांचा मृत्यू झाला. तर ७४ पेक्षा अधिकजण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून, राजकीय पाठबळ असल्याशिवाय एवढं धाडस कोणीही करु शकत नाही. परवानगी शिवाय जवळपास १५ हजार चौरस फुटांच्या भल्यामोठ्या होर्डिंगची उभारणी करण्यासोबतच परिसरातील जवळपास ५०-६० झाडांवर विष प्रयोग करून ती झाडें नष्ट केली गेली. विशेष म्हणजे या होर्डिंग्जची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आहे. आता या होर्डिंगबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

सोमवारी संध्याकाळी मुंबईतील वातावरणात अचानक बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. घाटकोपरच्या समता कॉलनीमध्ये रेल्वे पेट्रोल पंपवर एक भलमोठं होर्डिंग कोसळलं. त्याखाली अनेक जण अडकले. हल्लकल्लोळ माजला. मदतीसाठी आक्रोश सुरु झाला. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं मदतकार्य सुरु केलं.घटना घडली त्यावेळी पेट्रोल पंपजवळ १०० हून अधिक जण होते. होर्डिंग पडताच अनेक जण खाली अडकले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ यांनी बचावकार्य केलं. रात्रभर बचावकार्य सुरु होतं. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत होर्डिंगखाली अडकलेल्या ८६ जणांची सुटका करण्यात आली. त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला ७४ जखमींवर उपचार सुरु आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

१४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेलं होर्डिंग परवानगीशिवाय उभारण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, त्या जागेवर ४ होर्डिंग होते. त्याचा तपशील पोलीस आयुक्तांना आणि एसीपींना दिली होती. होर्डिंग लावण्यापूर्वी रेल्वेकडून पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. होर्डिंग लावणाऱ्या एजन्सीला पालिकेनं नोटिस पाठवली आहे. पालिकेकडून कमाल ४० बाय ४० चौरस फुटांच्या होर्डिंगला परवानगी देण्यात येते. पण कोसळलेलं होर्डिंग १२० बाय १२० चौरस फुटांचं होतं. त्याचं एकूण आकार १५ हजार चौरस फूट इतका होता.

अनधिकृत होर्डिंगवरील जाहिराती दिसण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील झाडांवल विषप्रयोग करण्यात आला होता. या प्रकरणी उद्यान विभागाच्या तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी २४ फेब्रुवारीला अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. अवैध होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत होतं. त्याला पालिकेची परवानगी नव्हती.मुंबईतील वाढतं प्रदूषण पाहता महापालिकेनं काही वर्षांपूर्वी पूर्व द्रुतगती मार्गावर पेल्टोफोरम, सुबाभूळ, पिंपळ आणि फॉक्स टेल पाम प्रजातींची झाडं लावली. पालिकेचे अधिकारी काही दिवसांपू्र्वी घाटकोपर पेट्रोल पंपासमोरील झाडांची पाहणी करत असताना त्यांना काही झाडं मृतावस्थेत आढळली. पाण्याअभावी अथवा अन्य कारणांमुळे झाडं मृत झाली असावीत असा त्यांचा अंदाज होता. पण ४० ते ५० झाडं एकाएकी सुकून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांचा संशय बळावला.

उद्यान विभागाच्या माहितीनुसार, पेल्टोफोरम, सबाभूळ आणि पिंपळ या झाडांना छिद्र पाडण्यात आलं. त्यानंतर त्यात विष ओतण्यात आलं. प्रत्येक झाडावर ५ ते ६ छिद्रं आढळली. पूर्व द्रुतगती मार्ग जंक्शन पूल ते रमाबाई आंबेडकर नगर येथील नाल्यापर्यंत दुभाजकावर असलेल्या २२ फॉक्स टेल पाम प्रजातीच्या झाडांच्या फांद्या तोडून विषप्रयोग केल्याचं निदर्शनास आलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!