Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीअमित शाह पंतप्रधान ! आधी योगींना बाजूला केले जाईल ; मोदी सप्टेंबरमध्ये...

अमित शाह पंतप्रधान ! आधी योगींना बाजूला केले जाईल ; मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार : केजरीवालांचा मोठा दावा

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी म्हणजे १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. मोदी यांनी स्वतःच २०१४ रोजी नियम लागू केला होता की, जो नेता ७५ वर्षांचा होईल त्याला निवृत्त केले जाईल. त्यांनी सर्वात आधी अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केले. आता मोदींच्या निवृत्तीची वेळ आली असून मोदी शाह यांच सख्य जगजाहीर असून, सप्टेंबर २०२५ मध्ये अमित शाह यांची पंतप्रधानपदावर वर्णी लावण्याची जय्यत तयारी या जोडगोळीने केली गेली आहे. असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर लोकसभेनंतर दोन महिन्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल आणि सप्टेंबर २०२५ नंतर अमित शाह देशाचे पंतप्रधान होतील, असाही दावा केजरीवाल यांनी केला आहे.

मोदीजी तुमच्या निवृत्तीनंतर गँरटी कोण पूर्ण करणार?
“पंतप्रधान मोदी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी अमित शाह पंतप्रधान होतील. म्हणूनच ते अमित शाह यांच्यासाठी मत मागत आहेत. जर भाजपाची सत्ता आलीच तर पुढच्या दोन महिन्यात योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल. त्यानंतर अमित शाह यांना पंतप्रधान केले जाईल. मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की, मोदींनी दिलेली गॅरंटी कोण पूर्ण करणार? अमित शाह मोदींची गॅरंटी पूर्ण करणार आहेत का? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात भाजपाच्या जागा कमी होणार आहेत. भाजपाला २०० जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे ४ जून नंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल, ज्यामध्ये आपचाही समावेश असेल, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

विरोधीपक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील

तिहार तुरुंगात अनेक दिवस काढल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. त्यानंतर आज त्यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली.

पंतप्रधान मोदी ‘एक देश, एक नेता’ अशी मोहीम राबवत असून ४ जून रोजी भाजपाची सत्ता आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील. तसेच भाजपामधीलही अनेक मोठे नेते राजकीय पटलावर दिसणार नाहीत. असा दावा केजरीवाल यांनी केला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!