अकोला दिव्य न्युज ब्युरो : साडे तीन मुहूर्तांपैकी एक सर्वश्रेष्ठ मुहूर्त असलेली अक्षय तृतीयेचा सण उद्या शुक्रवार १० मे रोजी साजरा करण्यात येतो आहे. जिल्हाधिकारी यांना असलेल्या अधिकारांतर्गत अकोला जिल्हाधिकारी कुंभार यांनी उद्या शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. सर्वच समाजात अक्षय तृतीयाचा अत्यंत महत्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पुर्वजांना तर्पण करुन पान (जेवण) वाढलं जाते.गावखेड्यात अक्षय तृतीयेला भांडी, माठ आणि शेतीसाठी मुहूर्ताचे बि-बियाणे खरेदी केले जाते. यासाठी जिल्हाधिकारी कुंभार यांनी आपल्या अधिकारान्वये सुट्टी दिली आहे.
त्यामुळे अकोला शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे कामकाज बंद राहणार आहेत. उद्या अक्षय तृतीयेची सुट्टी नंतर परवा दुसरा शनिवार आणि रविवार असल्याने उद्यापासून सलग तीन दिवस शासकीय कार्यालयातील कामकाज बंद राहणार आहेत.