Friday, November 22, 2024
Homeताज्या घडामोडीशरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ ! आजचे सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ ! आजचे सर्व कार्यक्रम रद्द

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांचे आज ६ जून रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. देशभरात होत असलेल्या लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्याचे मतदान उद्या मंगळवार ७ मे रोजी होत आहे. या टप्प्यातील प्रचार कालच थांबला आहे. तिसर्‍या टप्प्यात राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघ देखील आहे. यंदा प्रथमच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासह राज्यातील अनेक भागात दौरे आणि सभांचा धडका लावला. त्याच दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराचा अखेरचा दिवस होता. त्या निमित्ताने आज दुपारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पवार कुटुंबातील सर्व सदस्यांसह नागरिकदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.शरद पवार यांच्या जवळपास ५५ वर्षांच्या राजकीय जीवनात आजवर कधीच पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली नव्हती. पण यंदा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. यंदाच्या या निवडणुकीत दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी कोणीच सोडली नाही.

त्या सर्व घडामोडी दरम्यान काल सांगता सभेत शरद पवार भाषणावेळी उभे राहिले होते. ते काहीसे थकल्या सारखे वाटत होते. त्यामुळे बोलतानाही त्यांचा आवाज कातर होत होता. घसा बसल्याने शब्द देखील नीट फुटत नव्हते. त्यामुळे ते केवळ ४ ते ५ मिनिटेच भाषण करू शकले. त्यानंतर सभेच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार, अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उद्या ६ मे रोजी होणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून कळविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!