अकोला दिव्य न्युज ब्युरो : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच सर्वांगीण विकास किती महत्त्वाचा आहे असे सांगितले.म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत स्पर्धे आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले पाहिजे.सर्वांगीण विकास हाच शिक्षणाचा खरा उद्देश आहे,असे प्रदिप सिंह राजपूत यांनी सांगितले. सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गोदावरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदिपसिंह राजपूत यांनी ध्वजारोहण करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सन्मित्र पब्लिक स्कूलच्या प्राचार्या मनिषा राजपूत अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांना महाराष्ट्र दिन ,मराठी राजभाषा दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्राचार्या मनिषा राजपूत यांनी शिक्षणासोबतच आजच्या काळात संस्काराचे महत्व पटवून दिले.ज्यामुळे विद्यार्थी आपल्या जीवनात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील.त्यांनी एक सक्षम नागरिक तयार करणे हा शिक्षणाचा खरा हेतू आहे असे प्रतिपादन केले.यावेळी चालू शैक्षणिक सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करुन प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय अशा गुनानुक्रमानुसार गुणवंत विद्यार्थी निवडले गेले.
नर्सरीमधून वरद अमोल थोरात, अविश रणजित क्षीरसागर स्वरीत गोपाल गाडगे, केजी वन मधून काव्या संदीप राऊत, संबोधी सुबोध डोंगरे, सृष्टी रवींद्र शित्रे, केजी टू मधून विघ्नेश श्रीकृष्ण शेगोकार, अवनी नानाराव जाधव, आदित्य प्रकाश बुंदेले तर वर्ग पहिला मधून प्रियांशी राहुल वाडेकर, प्रियल राहुल इंगळे, तानसी मनोज पळसपगार आणि वर्ग दुसरा मधून स्वराज योगेश हरणे, रिशिका सागर जाधव, सानिध्या सतीश वाहुरवाघ, इयत्ता तिसरी मधून अंश संजय ढोले, माही देवराव चाकोते, आराध्या रुपेश बऊराशी तसेच इयत्ता चौथी मधून पार्थ अरुण गायकवाड, प्रियांशी प्रीतम वैद्य,साक्षी अशोक वानखडे यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले.
इयत्ता पाचवीमधून यश गणेश मोरे, समृद्धी सुरेश डांगे, दिया प्रशांत राऊत आणि इयत्ता सहावीमधून तन्वी कैलाश ठोंबरे, आर्या रोशन जगताप, अनुष्का पवन जूनारे, इयत्ता सातवी मधून समीक्षा रुपेश बऊराशी, तन्वी मनोज पळसपगार,नैतिक शिलवंत शिरसाट, इयत्ता आठवीमधून आदिती आशिष गावंडे,नील नितीन पांडे, श्रावणी सचिन देशमुख आणि इयत्ता नववीमधून अंशुमन सदानंद कोंडे, संस्कृती मोहन भटकर, प्रणव भरत ढेंगळे या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले.या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन खानझोडे तर आभार प्रदर्शन गाढे यांनी केले.