अकोला दिव्य न्युज ब्युरो : सर्वत्र कडाक्याच्या उन्हाच्या झळा असताना, एका ठिकाणी चिमुकल्या पक्ष्यांच्या कानाला भावणारा चिवचिवाट ऐकू येत होता. सर्वत्र वातावरण तप्त असताना मात्र लहान-लहान चिमुकल्यांचा कर्णमधुर असा कविता, गायन व प्रार्थना पठनाचा मधुर असा स्वर कानावर पडत होता. सुमारे १५ दिवस वातावरण भारावून गेले होते. असं भारावलेले वातावरण होतं येथील समर्थ बिझी बिझ स्कूल येथे.
दररोज संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत वर्ष ३ ते १० या वयोगटातील विदयार्थ्यांसाठी अतिशय वैशिष्टयपूर्ण व कलात्मक उन्हाळी शिबिराचे आयोजन केले होते. दिनांक १५ ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित केलेल्या या शिबीरात जवळपास १२५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
समर्थ बिझी बिझ स्कूल, रिधोरा व रणपिसे नगर, अकोला येथील विद्यार्थी देखील या उन्हाळी शिबीरामध्ये, सहभागी होते. नृत्य, गायन,इंग्रजी संभाषण, कॅलिग्राफी,विज्ञानाचे खेळ,चित्रकला,संगीत तसेच योगा व इतर कलाप्रकार नाविन्यपूर्ण प्रकारे येथे शिकविल्या गेले. पालक वर्ग अतिशय उत्साहाने व आनंदाने आपल्या पाल्यांना उन्हाळी शिबिरामध्ये घेऊन येत होते व आपल्या पाल्यांच्या आनंदात सहभागी होत होते.
या उन्हाळी शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष व संचालक प्रा. नितीन बाठे व संचालिका प्रा.जयश्री बाठे,समर्थ ग्रूप ऑफ एजुकेशन च्या कार्यकारिणीचे सहसचिव प्रा.किशोर कोरपे, किशोर रत्नपारखी, योगेश जोशी तसेच शैक्षणिक संचालिका सुवर्णा गुप्ता,प्रसिध्द शिक्षण तज्ञ तथा समर्थचे शिक्षण संचालक प्रा.डॉ.जी.सी. राव सर, प्राचार्या अश्विनी थानवी, प्राचार्या मुग्धा कळमकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
समर्थ पब्लिक स्कूल, रिधोरा तर्फे दरवर्षी अश्या वैशिष्टपूर्ण उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात यावे,असा आग्रह पालक वर्गातर्फे करण्यात आले. या उन्हाळी शिबिरामध्ये विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.