Saturday, November 23, 2024
Homeताज्या बातम्याचोराच्या मनात चांदणे ! भाजपने लोकसभेत ‘चारशे पार’चे लक्ष्य संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच...

चोराच्या मनात चांदणे ! भाजपने लोकसभेत ‘चारशे पार’चे लक्ष्य संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच ठरवले आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशाच्या संविधानात धोरणात्मक बदल करण्यासाठी २/३ संख्याबळ अत्यावश्यक आहे.गेल्या दहा वर्षांमध्ये संविधान बदलण्यासाठी आवश्यक संख्या नसल्याने भाजपला संविधान बदलण्यासाठी अधिकार नव्हता. येत्या काही महिन्यात संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहे. शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी संविधान बदलण्याचा डाव रचून, यासाठी ‘अब की बार 400 पार’ हा नारा दिला असल्याने, आरक्षणवाद्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करावे, असे आवाहन करीत ‘चोराच्या मनात चांदणे’ अशी म्हण आहे.तेच अमित शहा यांच्या मनात आहे. संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच भाजपने लोकसभेत ‘चारशे पार’चे लक्ष्य ठेवले असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीच्या कारवायांमध्ये शिक्षा कुणालाच झाली नाही. लोकशाहीऐवजी पोलिसी राज्य मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे २०१४ पासून १५ लाखाहून अधिक कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडले. राम मंदिराच्या उद्घाटनाच्यावेळी शंकराचार्यांचा सल्ला ऐकण्यात आला नाही. चारशे पारचा आकड्याची महत्त्वाकांक्षा व त्यातून संविधान बदलण्याचा विचार आदी कारणांमुळे २०१४ व २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ईडीच्या कारवायांमध्ये शिक्षा कुणालाच झाली नाही. उलट मोठ्या भ्रष्ट राजकारण्यांचा भाजपमध्ये प्रवेश करुन घेऊन चारशे पारचा आकड्याची जुळवाजुळव सुरू आहे.अति महत्त्वाकांक्षा व त्यातून संविधान बदलण्याचा विचार आणि वाढती महागाई, बेरोजगारी आर्थिक विषमता आदी कारणांमुळे २०१४ व २०१९ मध्ये भाजपकडे वळलेला आणि सध्याच्या नवीन मतदार व सवर्ण वर्ग यांचा संपूर्ण भ्रमनिरास झाला. त्याचा परिणाम म्हणजे मतदारांचा उत्साह कमी होऊन मतदानाची टक्केवारी कमी झाली.असेही अँड प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

शाहू, फुले, आंबेडकर व मानवतावाद स्वीकारणाऱ्या मतदारांवर आता मोठी जबाबदारी आहे. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही करण्याचा प्रयत्न त्यांनी थांबवला पाहिजे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये मतदान न करता भाजपवर राग व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या विरोधात मत व्यक्त करून आपला रोष जाहीर करावा, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केले. या टप्प्यामध्ये मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!