Friday, January 3, 2025
Homeराजकारणआज डॉ.अभय पाटील यांच्या प्रचारार्थ मुकूल वासनिक अकोल्यात ! पातूर व अकोला...

आज डॉ.अभय पाटील यांच्या प्रचारार्थ मुकूल वासनिक अकोल्यात ! पातूर व अकोला शहरात होणार जाहीर सभा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव, गुजरात प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार मुकुल वासनिक यांचा प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले आहे.यासाठी आज शनिवार 20 एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे अकोला लोकसभा उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या प्रचारार्थ सकाळी 11-30 वाजता हेलिकॉप्टर द्वारे खा. मुकुल वासनिक यांचे पातूर येथे आगमन होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत पातूर मधील सिदाजी महाराज मंगल कार्यालय परिसरात जाहिर सभेचे आयोजन केले आहे. त्यानंतर दुपारी 2- 30 वाजता त्यांचे अकोला महानगरात आगमन होणार असून, महानगरातील विविध परिसरात खा. मुकुल वासनिक प्रचार अभियान राबवणार असून महानगरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समवेत त्यांच्या प्रचार सभा ठिकठिकाणी आयोजित केल्या आहेत.

अकोला शहरात सायंकाळी 6 वाजता युसुफ अली अंजान चौक, अकोट फैल येथे जाहीर सभा होणार आहे.या प्रचार दौऱ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, भीमशक्ती, शेतकरी कामगार पक्ष आदी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!