अकोला दिव्य न्युज ब्युरो : वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ठरित्या उद्योग- व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरुष व्यवसायीकांना एका शानदार सोहळ्यात भूषण अकोला,भूषण विदर्भ,भूषण महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्थानीय औद्योगिक वसाहतीतील वेदांत बँकवेट येथे महाराष्ट्रीय ब्राम्हण व्यापारी संस्था व विजय मोहरीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात हे पुरस्कार देऊन व्यापारी आणि उद्योजक महिला व पुरुषांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून दीपाली नंद, प्रा सतीश फडके, डॉ.पार्थसारथी शुक्ला, सुहास गद्रे, विजय मोहरीर विराजमान होते. मान्यवरांचा सत्कार विजय मोहरीर, विजय खेर व आशिष अमीन यांच्या हस्ते करण्यात आला.प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष आशिष अमीन यांनी केले. प्रा.सतीश फडके यांनी व्यवसाय वाढविण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे यासाठी मार्गदर्शन केले. तसेच सुहास गद्रे, दीपाली नंद व डॉ पार्थसारथी शुक्ल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन महेश मोदक यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भूषण अकोला पुरस्कार नम्रता जोशी, वीणा नानोटी, किरण देशमुख, शैलजा नितीन कुळकर्णी, नंदकिशोर त्रिवाड, प्रज्ञा प्रकाश काळे, सुनिता सतीश खोडवे,सौ. निलिमा योगेश खेर,श्री. विजय खेर,सौ. स्वाती कमलाकर देशपांडे, रेखा मधुकर कुळकर्णी,पल्लवी मिलिंद जोशी, निलेश देव,अमृता के. सेनाड, सोनाली व्हरसाळे, दिलीप पांडे, वैशाली नरेन्द्र देशपांडे, रश्मि रविंद्र देशपांडे यांना प्रदान करण्यात आला.
यासोबतच पर्यटन व्यवसायातील उत्कृष्ठ कामगिरी तथा अतिशय दुर्गम ठिकाणी महिलाच्या सहलीचे यशस्वी आयोजन तसेच परप्रांतात आपल्या आगळ्या वेगळ्या नियोजनाचा, कामाचा ठसा उमटवला आहे. अशा असामान्य व्यवस्थापनाबद्दल इंद्रायणी माधव देशमुख यांना व्यापारी संस्थेकडून भूषण विदर्भ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चिखलदरा येथे नंद गणपती संग्रहालयाची जगभरातील कीर्ती आणि यशस्वी वाटचाली बद्दल प्रदिप नंद यांना भूषण महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चिखलदरा संग्रहालयात ६ हजारावर गणेश मुर्ती विराजमान असून त्यात गणपतीच्या चौसष्ट कला आणि २१ विद्या , विदर्भातील व पुण्यातील विनायकाची योग्य मांडणी आहे. त्यांना देशभरातील विविध संस्थेतर्फे उत्कृष्ट संग्रहालय म्हणून सन्मानित करण्यात आले.जगभरात या संग्रहालयाची कीर्ती वाढवली आहे. यासाठी डॉ पार्थसारथी प्रा सतीश फडके, सुहास गद्रे, विजय मोहरीर, आशिष अमीन व विजय खेर यांच्या हस्ते प्रदीप नंद यांना भूषण महाराष्ट्र पुरस्कार व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. आभार प्रदर्शन विजय खेर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने व्यापारी आणि अकोल्यातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.