Monday, November 25, 2024
Homeसामाजिकआज अकोल्यातील ३८ वर्षांची परंपरा जोपासत दुपारी ५ वाजता निघणार राम नवमी...

आज अकोल्यातील ३८ वर्षांची परंपरा जोपासत दुपारी ५ वाजता निघणार राम नवमी शोभायात्रा :

अकोला दिव्य न्युज ब्युरो : रामनवमीनिमित्त भक्तिमय वातावरणात शहर भगवामय झाले आहे. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून गत ३८ वर्षांपासून भव्य शोभायात्रेची परंपरा जोपासली जात आहे. राजराजेश्वर मंदिरातून आज दुपारी ४ वाजता निघणाऱ्या शोभायात्रेत ६० धार्मिक देखावे सहभागी होणार आहेत.

रामनवमीच्या पर्वावर शहरातील मोठे राम मंदिर, छोटे राम मंदिर, बिर्ला राम मंदिरासह विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली. भाविकांनी सकाळपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. चौकाचौकात भगव्या पताका लावून सजावट करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव साजरा केला जात आहे. शहरातून गेल्या ३८ वर्षांपासून भव्य शोभायात्रा काढण्यात येते.

विहिंपच्या संकल्पनेतून दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रेरणेतून रामनवमी शोभायात्रा काढण्याची परंपरा सुरू झाली. शहराचा आता हा प्रमुख महोत्सव झाला. मध्य भारतातील सर्वांत मोठी शोभायात्रा म्हणून त्याचा नावलौकिक आहे. ५०० वर्षानंतर अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यात आल्याने रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

श्रीरामनवमी शोभायात्रा परंपरेनुसार आज दुपारी ४ वाजता श्री राजराजेश्वर मंदिरातून निघणार असून प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे. शोभायात्रेत धर्मध्वजासह ११ घोडेस्वार राहणार असून बालशिवाजी, जिजामाता, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, ताराबाई आणि इतर घोड्यांवर देखावे राहतील. श्रीराम पादूकासह ५० महिला दिंडी, १० पुरुष वारकरी दिंडी, ढोलपथक आदींचा शोभायात्रेत समावेश राहील. सर्व देखावे धार्मिक स्वरुपाचे राहणार आहेत.

Oplus_131072
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!