Thursday, November 21, 2024
Homeसांस्कृतिकUPSC चे निकाल जाहीर ! आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान...

UPSC चे निकाल जाहीर ! आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले असून आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचं दिसून आलं होतं. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे. देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे. २०२३मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल असून upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहाता येईल.

१०१६ उमेदवार झाले UPSC उत्तीर्ण!
यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण खुला प्रवर्ग – ३४५, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग – २८, ओबीसी – ५२, अनुसूचित जाती – ५ तर अनुसूचित जमाती – ४ असं होतं.

आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.

कसा पाहाल UPSC चा निकाल?
upsc.gov.in या संकेतस्थळावर UPSC CSE Results या लिंकवर क्लिक करा. आपले लॉगइन डिटेल्स इथे भरा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल. निकालपत्र डाऊनलोड करण्याचाही पर्याय इथे देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!