Thursday, January 2, 2025
Homeताज्या घडामोडी..... प्रकाश आंबेडकरांच्या निमित्ताने काजवा जन्माला आलाय : भाजप नेते मधुकर चव्हाण

….. प्रकाश आंबेडकरांच्या निमित्ताने काजवा जन्माला आलाय : भाजप नेते मधुकर चव्हाण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : ज्या आंबेडकरांनी घटना निर्माण केली, सूर्यासारख्या तेजस्वी आंबेडकरांच्या पोटी प्रकाश आंबेडकरांच्या निमित्ताने काजवा जन्माला आलाय. तुम्ही भाजपाला शिव्या द्या, तुम्ही शिवसेनेला शिव्या द्या, तुम्ही आमच्या धोरणांवर टीका करा. पण राजकीय धुडगूस घालणा-यांसोबत तुम्ही त्यांच्या बाजूला जाऊन बसलात. कुठे आलाय महाराष्ट्र? असा शब्दातून भाजप नेते मधुकर चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड प्रकाश आंबेडकर यांच्यावर टिकास्त्र सोडले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना जोर आला आहे. अनेक ठिकाणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सामान्य मतदारांना आपल्याकडे खेचण्याकरता जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे यंदा सत्तांतर होतंय की केंद्रात पुन्हा मोदी राज पाहायला मिळतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी गुहागर येथे बोलत असताना, वंचित बहुजन आघाडीचे अँड आंबेडकर यांच्याबद्दल मोठे विधान केले.ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत शरद पवारांसारखा राजकीय धुडगूस महाराष्ट्रात कोणी घातला नाही. जरांगे पाटलासारख्या भंपक माणसाला उभं केलं, छगन भुजबळ मंत्री असतानाही त्यांना शिव्या दिल्या गेल्या”आणि अँड आंबेडकर त्यांच्या बाजूला जाऊन बसले.

पुन्हा घडाळ्याचे काटे उलटे फिरायला निघाले आहेत. मोदींना ठार मारण्याचे कट जगामध्ये शिजत आहेत. मी जबाबदारीने बोलत आहेत. हा नेता पुन्हा भारताचा पंतप्रधान झाला तर जगात देश बलशाली होईल. कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेवून कामाला लागला. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय, असं यावेळी मधुकर चव्हाण म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!