Sunday, November 24, 2024
Homeताज्या घडामोडीसरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान मोदी यांच्या नजरकैदेत ! खळबळजनक आरोप

सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान मोदी यांच्या नजरकैदेत ! खळबळजनक आरोप

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरकैदेत आहे.चंद्रपूरचे रहिवासी असलेल्या संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या घरी जावून विचारले पाहिजे तुम्हाला संविधान मान्य आहे की मनुस्मृती, संघाने स्वातंत्र्यानंतर संघ मुख्यालयावर तिरंगा ध्वज का फडकवला नाही असा प्रश्न करा असे ॲड. असीम सरोदे म्हणाले. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपला पराभूत करण्याचे आवाहन केले.चंद्रपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडांगणावर निर्भय बनो सभा पार पडली. सभेला ॲड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी उपस्थित होते. प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या सभेला मार्गदर्शन करताना ॲड. सरोदे म्हणाले, आमचा लढा हा मोदी- शहा या व्यक्तीबद्दल नाही तर प्रवृत्ती विरुद्ध आहे.

देशात आणीबाणी लादली गेली ही चूक लक्षात आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी जनतेची जाहीर माफी मागितली होती. त्यांचे नातू राहुल गांधी यांनी देखील जाहीर माफी मागितली आहे. मात्र वारंवार खोटं बोलून, जनतेची दिशाभूल करून, महिलांवर बलात्कार, विनयभंग करणाऱ्या खासदारांना सोबत घेऊन, गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या सोबत घेत हुकूमशाहीकडे देशाला घेऊन जाणारे मोदी साधी माफी मागायला तयार नाहीत. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या एकाही उमेदवाराला निवडून द्यायचे नाही. महाराष्ट्रात उजेड पसरविणाऱ्या चंद्रपुरातून भारतभर प्रकाश पसरला पाहिजे व अंधारमुक्त देश झाला पाहिजे असेही सरोदे म्हणाले.

महागाई, बेरोजगारी बद्दल मोदी बोलत नाही. विद्यार्थी मुलांच्या भविष्याशी सरकारने खेळ चालविला आहे. स्पर्धा परीक्षांचे ७० पेपर लीक झाले आहे. ४५ वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आहे. प्रत्येक तासाला २ बेरोजगार आत्महत्या करीत आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. षडयंत्र करून बँकेच्या माध्यमातून वळवत मोठा भ्रष्टाचार केला आहे असेही ते म्हणाले. विद्यार्थी, बेरोजगार, शेतकरी, दलीत समाज व महिला मोदी सरकार उलटवतील असा विश्वास व्यक्त केला. डॉ. विश्वंभर चौधरी यांनी महाराजांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उत्तरप्रदेशकरन सुरू असल्याची टीका केली. मोदी समर्थक हा अध्यात्मिक हिंदू नाही तर राजकीय हिंदू आहे. मूळ हिंदू विरुद्ध राजकीय हिंदू अशी ही लढाई आहे. ज्यांच्या डीग्रिचा पत्ता नाही ते विश्व गुरू बनले आहेत तर उच्च विद्या विभूषिताला मोनीबाबा व पप्पू ठरविले जात आहे असेही चौधरी म्हणाले.

प्रास्ताविक बंडू धोत्रे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश दुधापचारे यांनी केले. आभार उमाकांत धांडे यांनी मानले. कार्यक्रमाला काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर, शहर अध्यक्ष रामु तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना अध्यक्ष संदीप गिऱ्हे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, सुनील मुसळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!