अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष म्हणजे २४×७ ‘इलेक्शन मोड’ वरचा पक्ष, असं म्हटलं जातं, ते चुकीचेही नाही. लोकसभा निवडणुकीत ४०० पार हा नारा देत निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपचे निवडणूक नियोजन व दूरदृष्टी खरोखरच शिकण्यासारखे असते. यंदा अनेक लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत होणार आह. हे ओळखून, प्रत्येक मतदारसंघातील दिव्यांग आणि वय ८० आणि त्यावरील वयोगटातील जेष्ठ मतदारांवर भाजपाने लक्ष ठेवून व्युहरचना केली आहे. ‘पहिले या, पहिले घ्या’ या तत्वावर भाजपाने प्रत्येक मतदारसंघातील दिव्यांग आणि वय वर्षे ८० आणि त्यावरील मतदारांचे १०० टक्के मतदान करुन घेण्यावर भर दिला आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात वय ८० आणि त्यावरील वयोगटात जवळपास 49 हजार 223 मतदार असून जवळपास १२ हजार दिव्यांग मतदार आहेत.तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात वय ८० आणि त्यावरील वयोगटात 52,708, वाशिम लोकसभा मतदारसंघात 49,440, अमरावती लोकसभा मतदारसंघात 58,970 एवढे मतदार आहेत.या दोन्ही वर्गातील मतदारांकडून भाजप उमेदवाराला मतदान कसे करुन घ्यावे, यासाठी खास बैठक झाली.
याबैठकीत दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांचे घरी जाऊन त्यांचे मतदान करुन घेण्यासाठी एक वेगळीच टीम कामाला लागली आहे. यासाठी आवश्यक वेगळी व्यवस्था केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात यासाठी एक प्रमुख नियुक्त करण्यात आला आहे. या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक वार्ड वा प्रभागात असलेल्या या मतदारांचे मतदान करुन घेण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. निवडणूकीच्या धामधुमीत या मतदारांकडे सहजपणे दुर्लक्ष होते.पण प्रत्येक लोकसभा मतदारसंघात या मतदारांची संख्या जवळपास ६० ते ७० हजारांवर असून, यंदाच्या निवडणुकीत हे मत निर्णायक ठरणार असल्याने यंदा भाजपने याकडे विशेष बात म्हणून लक्ष केंद्रित केले आहे.
निवडणूकीत प्रत्येक बुथ जणू एक विधान सभा मतदार संघ आहे.अशा पध्दतीने भाजप डाव मांडून, त्या मतदान केंद्रावरील भाजपा समर्थक मतदारांचे शतप्रतिशत मतदान करुन घेण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येतो. त्याच प्रमाणे दिव्यांग आणि वयोवृद्धांना घरीच मतदान करण्याचा सुविधेतून भाजप उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रत्येक बुथ प्रमुख व त्याचे सहकारी नियोजन करीत आहेत. भाजप नेत्यांकडून त्यासाठी योग्य ‘आदरतिथ्य’ देखील केल्या जाते. हे विशेष