अकोला दिव्य न्युज ब्युरो : गुढीपाडव्यापासून डॉ. भूषण फडके यांच्या ओजस्वी वाणीतून बिर्ला मंदिर येथे संगीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम कथा आयोजनाचे यंदा तिसरे वर्ष असून डॉ.भूषण फडके यांनी पुणे येथे श्रीराम कथेचे यशस्वी कार्यक्रम सादर केले आहेत. राम कथा आजच्या जीवनात कशी उपयुक्त आहे हे फडके आपल्या निरूपणात सांगतात. संपूर्ण श्रीराम कथेला साजेशे गीत रामायण व इतर भक्ती गीते असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. श्रीरामाच्या भक्तिरसात पाच दिवस भावीक रंगून जातात. सौ.वैशाली फडके, निखिल देशमुख, सतीश खोडवे, हार्दिक दुबे, सुमंत तर्हाळकर आणि देवशिष फडके इतर सहयोगी कलावंत आहेत.उद्या गुढीपाडवा 9 एप्रिल पासून 13 एप्रिल पर्यंत संध्याकाळी साडेसहा ते नऊ या वेळात हा कार्यक्रम बिर्ला मंदिर जठारपेठ येथे होणार आहे.
तसेच दरवर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या वतीने स्व. अंबरिश कविश्र्वर युवा पत्रकार पुरस्कार दि. १२ एप्रिल २०२४ रोजी वितरित करण्यात येईल.असे निलेश देव यांनी कळविले. चैत्र नवरात्र निमित्ताने शहरातील विविध भजनी मंडळाच्या वतीने बिर्ला राम मंदिर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे,
त्या मध्ये चैतन्य महिला भजनी मंडळ अकोला यांचे १० एप्रिलला तर ११ एप्रिलला जिजामाय महिला भजनी मंडळ तसेच १३ एप्रिलला स्वरदा महिला भजनी मंडळ असे तीन प्रमुख भजन मंडळाचे भजन दुपारी ४ ते ६ आयोजित करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन निलेश देव मित्र मंडळाने केले आहे.संस्कुती संवर्धन समिती स्वागत यात्रेची सकाळी 9 वाजता महाआरती व भव्यदिव्य स्वागत बिर्ला राम मंदिर होईल.
