अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील राजस्थानी समाजातील सर्व जाती समूहाच्या सांस्कृतिक संवर्धन व सामाजिक एकोपासाठी गत 29 वर्षापासून दरवर्षी गुढीपाडव्याला राजस्थानी दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा राजस्थानी दिनाचे औचित्य साधून मंगळवार 10 एप्रिलला कृष्ण भक्तीवर आधारित लोकप्रिय व ऐतिहासिक ‘नानी बाई को मायरो’ नृत्य नाटिका समाजातील 51 कलाकारांच्या समवेत सादर करण्यात येणार आहे.अशी माहिती राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अग्रसेन भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सिद्धार्थ शर्मा, महासचिव शैलेंद्र कागलीवाल, सुधीर रांदड, दिलीप खत्री, निकेश गुप्ता आणि विजय तिवारी यांनी माहिती देताना सांगितले की, गुढीपाडवा हा दिवस राजस्थानचा वर्धापन दिन म्हणून संपूर्ण भारतात अनेक वर्षांपासून साजरा केला जातो. या निमित्ताने 9 एप्रिल रोजी सायंकाळी 6-30 वाजता प्रमिलाताई ओक हॉल येथे राजस्थानी कलाकारांच्या वतीने राजस्थानी भाषेत ‘नानीबाई को मायरो’ नृत्य नाटिका राजस्थानी समाजबांधवांसाठी निःशुल्क आयोजित केली आहे. या नाटिकेत राजस्थानी समाजातील सर्वच घटकातील 51 महिला, पुरुष कलाकार सहभागी होऊन अप्रतिम अशी संगीतमय सादरीकरण करणार आहेत.
नाटिकेचे कथा गायक डब्बूजी उर्फ पंडित उमेश शर्मा असून अभिनय व गायन नेतल शर्मा करणार आहे. दिग्दर्शक सुनील शर्मा आहेत.या नृत्य नाटिकेचा मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या निमित्ताने राजस्थानी समाजातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून या भव्यदिव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शैलेंद्र पारक, मनोज बंब, महेश खत्री, राजेश राजोरिया, धनराज आजाडीवाल, मदन भरगड, दीपक साकला, जगदीश प्रजापत, अँड.सुभाष सिंह ठाकूर, दयाराम शर्मा, अजय सेंगर, अँड पप्पू मोरवाल, अँड.हेमसिंह मोहता, प्रा.अनुप शर्मा, अँड.राघव शर्मा समवेत अग्रवाल समाज, माहेश्वरी समाज, खंडेलवाल समाज, राजस्थानी ब्राह्मण समाज, ओसवाल समाज, खत्री समाज, जाट समाज, सेन समाज, गुर्जर समाज, जिनगर समाज, प्रजापत समाज, राजपूत समाज, जांगीड समाज, क्षत्रिय महासभा, कुमावत बेलदार समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करीत असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी सेवा संघाचे पदाधिकारी व सेवाधारी उपस्थित होते.