अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड आंबेडकर यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून डॉ.अभय पाटील यांची नावाची घोषणा केल्याबद्दल कॉंग्रेस नेत्यांसोबत चर्चा करु, असे शरदचंद्र पवार यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे आज मुंबईत महाविकास आघाडीची जागा वाटपासाठी अंतिम निर्णयासाठी शेवटची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या शिष्टाई नंतर कॉंग्रेसकडून काय भुमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड आंबेडकर यांनी काल बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रीम सुळे यांना पाठिंबा देण्यासोबतच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून मुस्लिम समाजातील उमेदवार देत, शिवसेनाला सुरक्षित केले. यापुर्वी नागपूर व कोल्हापूर या दोन मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत गणित जमलं तर… यादृष्टीने मविआच्या नेत्यांचे प्रयत्न आहे. काल आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांचे नाव आणि समाज बघितले तर काही तरी होणार असं राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. बारामतीसाठी आंबेडकरांनी घेतलेली भुमिका अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात दस्तुरखुद्द आंबेडकर यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आल्याने शरद पवार यांनी स्वतःहून याची दखल घेतली. भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत व कोणत्याही प्रकारची मदत होणार नाही, यावर सर्वच विरोधीपक्षांचे एकमत झाले आहे. तेव्हा अकोला लोकसभा मतदारसंघबाबत कॉंग्रेस नेत्यांसोबत चर्चा करून हा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे शरदचंद्र पवार यांनी कालच सांगितले आहे. कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना दिल्ली येथे बोलावले असून, शरद पवार यांनी केलेल्या शिष्टाईची फलश्रुती काय होते, हे येत्या काळात दिसून येईल.
आता काय होते