Thursday, December 26, 2024
Homeन्याय-निवाडाडॉ.प्रविण लोखंडे यांचे आवाहन ! सहकारी संस्थांच्या आर्थिक नुकसानाची निश्चितीसाठी गठीत होणार...

डॉ.प्रविण लोखंडे यांचे आवाहन ! सहकारी संस्थांच्या आर्थिक नुकसानाची निश्चितीसाठी गठीत होणार समिती


अकोला दिव्य न्युज ब्युरो : अनियमितता, गैरव्यवहार इत्यादीच्या माध्यमातुन सहकारी संस्थांच्या झालेल्या आर्थिक नुकसानाची निश्चिती करणे तसेच अशा आर्थिक नुकसानीची वसुली, दोषी संचालक मंडळ किंवा संस्था अधिकारी यांच्याकडून करण्यासाठी सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ तसेच कलम ८८ अन्वये चौकशी केली जाते. अशा प्रकरणी चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी/ प्राधिकृत अधिकारी यांची १ जुलै २०२४ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी नामतालीका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील वकील, चार्टड अकांटट, निवृत्त न्यायाधीश तसेच सहकार खात्यातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी (वयाची ७० वर्ष पूर्ण न झालेल्या) यांचेकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्जाचे विहीत नमुने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांचे कार्यालयात १ ते ३० एप्रिल पर्यत कार्यालयीन वेळेत मिळणार आहे. याबाबतची जाहीर सुचना अकोला जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व शाखा, गावपातळीवरील सेवा सहकारी संस्था, सर्व पतसंस्था, सर्व तहसील कार्यालये, सर्व गट विकास अधिकारी कार्यालये यांच्या नोटीस बोर्डवर प्रसध्दी करण्यात आली आहे.

तेव्हा अकोला जिल्हातील इच्छुक वकील, चार्टड अकांटंट, निवृत्त न्यायाधिश, निवृत्त अधिकाऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अकोला, अकोट, तेऱ्हारा, मूर्तीजापूर, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.प्रविण एच. लोखंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!