अकोला दिव्य न्युज ब्युरो : शुभम डेकाेरेटर्सचे संचालक व हाॅटेल व्हीएस इम्पेरियलचे रविंद्र उपाख्य रवी शर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणात हाॅटेल व्हीएस इम्पेरियलचे संचालक विनाेद अग्रवाल यांच्याविरुद्ध भादवी कलम ३०६, ५०४ आणि ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस पथम नागपूर येथे गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हाॅटेल व्हीएस इम्पेरियलचे संचालक विनाेद अग्रवाल यांच्याकडून सतत सुरू असलेला मानसिक छळामूळे तसेच आर्थिक फसवणूक आणि हॉटेल परिसरात गार्डन डेव्हलपमेंटसाठी खर्ची घातलेली जवळपास ४० लाख रुपयांची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याने आपल्या मृत्यूसाठी एकटे विनोद अग्रवाल जबाबदार आहेत, असे रवि शर्मा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले आहे, अशा आशयाची तक्रार रवि शर्मा यांच्या पत्नीने दिल्याने डाबकी रोड पोलिस ठाण्यात विनाेद अग्रवाल याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी आरोपीचा शोध घेतला जात असून अकोला पोलिसांचे एक पथक नागपूर येथे गेले आहे.
शुभम डेकाेरेटर्सचे संचालक रवि शर्मा यांची अकोला लगतच असलेल्या आलिशान हाॅटेल व्हीएस इम्पेरियलचे अधिकृत व्हेंडर म्हणून हाॅटेल व्हीएसचे संचालक विनाेद महावीरप्रसाद अग्रवाल यांनीच नेमणूक केली होती. या नियुक्ती नंतर शर्मा यांनी या ठिकाणी संपुर्ण गार्डन तयार केले. विविध आकर्षक झाड स्वत:च्या खर्चाने लावलीत व जगवली. स्वतः देखरेख व मेंटनन्स करीत हाेते. यासाठी रविंद्र शर्मा यांनी स्वतःजवळून जवळपास ३० ते ४० लाख रुपये खर्च केला. या ठिकाणी होणाऱ्या लग्न, रिसेप्शन, साक्षगंध किंवा अशा प्रकारचा काेणताही कार्यक्रम असलाकी या ठिकाणासाठी होणारी रक्कम संबंधित ग्राहकांकडून संचालक अग्रवाल स्वत: घ्यायचे. जेव्हा की ठरल्याप्रमाणे ग्राहकांकडून देयकाची रक्कम घेण्याचा अधिकार अग्रवाल यांना नाही. जेव्हा शर्मा हे त्यांच्या डेकाेरेशनसह विविध बाबींवर खर्च केलेल्या रक्कमेसह भाडयाची रक्कम मागत. तेंव्हा त्यांना विविध कारण समाेर करीत अग्रवाल पैसे देण्यास नकार देत हाेते. अशी तक्रार त्यांची पत्नी आरती शर्मा यांनी डाबकी राेड पाेलिस ठाण्यात केली.
घटनेच्या तीन दिवसांपुर्वी अग्रवाल यांनी वाद घातल्याने प्रचंड मानसीक दडपणात येऊन रविंद्र शर्मा यांनी आत्महत्येसारखे टाेकाचे पाउल उचलले, अशी तक्रार त्यांच्या पत्नीने केल्यानंतर डाबकी राेड पाेलिसांनी विनाेद महावीरप्रसाद अग्रवाल याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आराेपी अग्रवाल याचा पोलिस शाेध घेत असल्याची माहिती आहे.