Friday, November 22, 2024
Homeताज्या घडामोडीभाजपाकडून विरोध झुगारून नवनीत राणांना उमेदवारी ! अडसूळ व बच्चू कडूंच्या मनधरणीचं...

भाजपाकडून विरोध झुगारून नवनीत राणांना उमेदवारी ! अडसूळ व बच्चू कडूंच्या मनधरणीचं आव्हान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मागील (२०१९) लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून तत्कालीन शिवसेनेचे खासदार अडसूळ यांना पराभूत करून विजयी झालेल्या नवनीत कौर राणा यांना होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती भाजपा आणि मित्रपक्षांतील विरोध जुगारून भाजपाने अमरावतीतून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. यावेळी नवनीत राणा या भाजपाच्या तिकीटावर अमरावतीची लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, दस्तुरखुद्द अमरावती भाजपातील सर्वांचा विरोध आणि शिवसेना (शिंदे) व इतर मित्रपक्षांकडून जोरदार विरोध केल्या जात असल्याने नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र भाजपाने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यामध्ये नवनीत राणा यांचं नाव झळकले.

नवनीत कौर राणा यांना अमरावतीत उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका अडसूळ आणि एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू यांनी घेतली आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना सुप्रीम कोर्टातील निर्णय नवनीत कौर राणा यांच्या विरोधात गेला तर, या पार्श्वभूमीवर राणा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं.

भाजपासमोर अडसूळ-बच्चू कडूंच्या मनधरणीचं आव्हान
बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ते म्हणाले, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्या नवनीत राणाने आम्हाला अपमानित केलं त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही. कार्यकर्त्यांची मानसिकताच नाही. राजकारणात झीरो झालो तरीही चालेल पण इतकी शरणागती पत्करणार नाही. काहीही झालं तरीही राणांचा प्रचार करायचा नाही ही कार्यकर्त्यांची मानसिकता आहे.

नवनीत राणांची राजकीय वाटचाल
नवनीत कौर-राणा या चित्रपट अभिनेत्री होत्‍या. यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍याशी २०११ मध्‍ये विवाह केला. त्‍यानंतर त्‍यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. २०१४ च्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या उमेदवारीवर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्‍यावेळी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचा तब्बल १ लाख ३७ हजार मतांनी पराभव केला होता.

राणांच्‍या जात प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्‍हणून निवडणूक लढवली. त्‍यांच्‍या उमेदवारीला कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत त्यांनी अडसूळ यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!