अकोला दिव्य मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील संवैधानिक सरकार पाडून, भाजपाचे गैरकायदेशीर सरकार स्थापनेसाठी, राज्यपालपदाची सर्व मर्यादा पायदळी तुडविणारे महाराष्ट्राचे तत्कालीन वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे एक एक कारनामे उघड होत आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या निनावी पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्या शिक्षण संस्थेने अंबानी यांच्याकडून 15 कोटी रुपयांची देणगी घेतली आहे. अनिल गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवून चौकशीची मागणी केली आहे.
भगतसिंग कोश्यारीसारख्या माणसाने आपल्या पदाचा उपयोग करून उत्तराखंड मधील एका शाळेच्या नावाने भरपूर माया गोळा केली आहे. शाळेत १०० सुद्धा मुले नाहीत अशा शाळेकरीता कोट्यावधीच्या देणग्या कोश्यारी यांनी गोळा केल्या आहेत. त्या पैशातून आपला पुतण्या दीपेन्दरसिंग कोश्यारी याच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमीन खरेदी करून तिथे रिसोर्ट चालू केले आहे. अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी १५ कोटी रुपये घेतले आहेत.उत्तराखंड राज्यातील सरस्वती विहार, डिगरा मुवानी, चामू, कनालीछीना, पिथौरागढ देवस्थळी या भागात दीपेन्दरसिंग यांच्या नावाने भरपूर संपत्ती गोळा केली आहे.वर्ष २०१९ पूर्वी सस्थांना किती देणग्या मिळाल्या आणि २०१९ ते २०२३ या कालावधीत किती देणग्या मिळाल्या याची तुलना सहज करता येऊ शकेल. Devbhumi Shiksha Prasar Samiti, Nainital Bank Haldwani Branch, Account No-0561000000000310 अशी माहिती आहे. याशिवाय SBI मधील एका खात्यातही अनेक व्यवहार केले गेले आहेत.
अनिल गलगली यांनी यापूर्वी आरटीआयद्वारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या संस्थेने जमा केलेल्या देणग्यांबाबत माहिती घेतली आहे. आता या प्रकरणाची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल, अशी मागणी गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.