गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांचे विशिष्ट क्रमांक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात स्टेट बँकेला दिले होते. त्यानुसार, स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचा तपशील आणि विशिष्ट क्रमांक यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली आणि आयोगाने गुरुवारी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.
स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीवरून निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक रोख्यांसदर्भात जाहीर केलेल्या माहितीनुसार, भाजपाला देणगी देणाऱ्या ४८७ कंपन्यांपैकी टॉप १० कंपन्यांनी २ हजार ११९ कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कम एप्रिल २०१९ पासून रोखण्यात आलेल्या पक्षाच्या एकूण ६ हजार ६० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांच्या ३५ टक्के आहे.
राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या फ्युचर गेमिंगने १ हजार ३६८ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आहेत. यापैकी, भाजपाला १०० कोटी, काँग्रेसला ५० कोटी, द्रमुकला ५०९ कोटी, वायएसआर काँग्रसेला १६० कोटी दिले आहेत. देणगी देण्यात क्रमांक २ वरील मेघा ग्रुपने एकूण १ हजार १९२ कोटींचे रोखे खरेदी केले असून भाजपाला ५८४ कोटी आणि काँग्रेसला ११० कोटींचं वाटप केलं आहे.एमकेजे समूहाच्या चार कंपन्यांनी एकूण ६१७ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले असून ते तिसऱ्या क्रमांकाचे मोठे देणगीदार आहेत. या रोख्यातून भाजपाला ३७२ कोटी रुपये, काँग्रेसला १६१ कोटी, तृणमूल काँग्रेसला ४७ कोटी रुपये मिळाले आहेत.
RPSG च्या आठ कंपन्यांनी ५८४ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले, ज्यामुळे ते चौथ्या क्रमांकाचे देणगीदार बनले. समूहाच्या चार प्रमुख देणगीदार कंपन्यांनी – हल्दिया एनर्जी (रु. ३७७ कोटी), धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर (रु. ११५ कोटी), फिलिप्स कार्बन (रु. ३५ कोटी) आणि क्रेसेंट पॉवर (रु. ३४ कोटी) यांनी मिळून ५६१ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. यामध्ये तृणमूलला ४१९ कोटी रुपये, भाजपला १२६ कोटी आणि काँग्रेसला १५ कोटी रुपये मिळाले आहेत.
आदित्य बिर्ला समूह हा एकूण ५५३ कोटी रुपयांच्या रोखे खरेदी मूल्यासह पाचवा सर्वात मोठा देणगीदार आहे. समूहाच्या प्रमुख तीन देणगीदार कंपन्या – एस्सेल मायनिंग (रु. २२५ कोटी), उत्कल अल्युमिना इंटरनॅशनल (रु. १४५ कोटी) आणि बिर्ला कार्बन (रु. १०५ कोटी) यांनी ४७५ कोटी रुपयांचे रोखे दिले. यापैकी २४५ कोटी रुपये बीजेडीकडे आणि २३० कोटी रुपये भाजपकडे गेले.
या यादीत पुढ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सहयोगी कंपनी आहे Qwik सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड आहे. या कंपनीने रोख्यांवर ४१० कोटी रुपये खर्च केले. यामध्ये भाजपला ३७५ कोटी आणि शिवसेनेला २५ कोटी रुपये मिळाले आहेत.
बाँड खरेदी करणाऱ्या वेदांत लिमिटेडने ४०१ कोटी रुपये खर्च केले. २२७ कोटी रुपयांसह भाजपा सर्वाधिक लाभार्थी आहे, तर काँग्रेस आणि बीजेडीला अनुक्रमे १२५ कोटी आणि ४० कोटी रुपये मिळाले आहेत. भारती समूहाच्या चार कंपन्यांनी २४७ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. भारती एअरटेल लिमिटेडने रोख्यांवर १८३ कोटी रुपये खर्च केले. त्यात भाजपला १९७ कोटी रुपये मिळाले आहेत.
जिंदालच्या चार कंपन्यांनी १९२ कोटी रुपयांचे रोखे दान केले. जिंदाल स्टील अँड पॉवर या सर्वात मोठ्या खरेदीदाराने १२३ कोटी रुपये खर्च केले. बीजेडीला १०० कोटी रुपयांचा सिंहाचा वाटा मिळाला, तर काँग्रेस आणि भाजपला अनुक्रमे २० कोटी आणि ३ कोटी रुपयांचे रोखे मिळाले.
अहमदाबाद -आधारित टोरेंट समूह, दहाव्या क्रमांकाचा देणगीदार आहे. या तीन कंपन्यांद्वारे १८४ कोटी रुपयांची देणगी दिली. सर्वात मोठे देणगीदार – टोरेंट पॉवर लिमिटेड – १०७ कोटी रुपये खर्च केले. यामध्ये भाजपला १०७ कोटी रुपये, तर काँग्रेस आणि आपला अनुक्रमे १७ कोटी आणि ७ कोटी रुपये मिळाले.