अकोला दिव्य न्युज ब्युरो : एक दिवसीय जलद बुध्दिबळ स्पर्धेत ७ वर्ष वयोगटात इशान सारडा आणि ११ वर्ष वयोगटात विवान सारडा या भावंडांनी अनुक्रमे तृतीय व प्रथम विजेतापद पटकाविले. पॉवर चेस अकॅडमी आणि स्कुल ऑफ स्कॉलर्स पारस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय जलद बुध्दिबळ स्पर्धेत इशान याने ७ वर्ष वयोगटात जलद गतीने सोंगट्या चालवत प्रतिस्पर्धी स्पर्धकाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करून प्रथम पुरस्कार पटकावले. याच स्पर्धेत ११ वर्ष वयोगटात विवान सारडा यांनी यशाची परंपरा कायम ठेवून तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.
अकोला माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक व व्यावसायिक सतिश सारडा यांचे इशान आणि विवान हे नातू असून जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयातील प्रतिथयश विधिज्ञ सौरभ सारडा यांचे सुपुत्र आहेत. अभ्यासाबरोबरच कला व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त होण्यासाठी इशान व विवान यांना लहानपणापासूनच प्रोत्साहन दिल्या जात आहे आणि यामुळे दोन्ही भावंडं बुध्दिबळ स्पर्धेत हिरीरीने सहभागी होऊन यश प्राप्त करीत आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.