अकोला दिव्य न्युज ब्युरो : तापमानात जागतिक पातळी गाठणाऱ्या अकोला शहर व परिसरात मागील 15 वर्षापासुन वृक्षारोपणाची चळवळ राबविणारे विवेक पारसकर यांचा सत्कार अकोला जिल्हा मनसेतर्फे सत्कार करण्यात आला. मनसेच्या18 व्या वर्धापनदिन निमित्त आयोजित काव्य संमेलनात विदर्भात सर्वाधिक वृक्षारोपण करणारे विवेक पारसकर यांचा प्रसिद्ध हास्यकवी अनंत खेळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वर्षी आई स्व. लतिका पारसकर यांच्या जन्म दिनानिमित्त 9 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान अकोल्यात घरोघरी बेलाच्या 1 लाख रोपांचे वाटप करणार असल्याचे विवेक पारसकर यांनी सांगितले. यासाठी 1 लाख रोपे तयार झाली असुन त्यांची निगा राखली जात असल्याचे पारसकर म्हणाले. या प्रसंगी अकोल्याचे गणमान्य व रसिक हजर होते. प्रास्ताविक मनसे शहर अध्यक्ष भगत यांनी केले.