Wednesday, January 15, 2025
Homeताज्या बातम्याडॉ. ओमप्रकाश रूहाटिया यांना मातृशोक : आज ११ वाजता अंत्यसंस्कार

डॉ. ओमप्रकाश रूहाटिया यांना मातृशोक : आज ११ वाजता अंत्यसंस्कार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : ख्यातनाम रूहाटिया उद्योग समुहाचे संस्थापक स्व. कालुराम रूहाटिया यांच्या पत्नी आणि रूहाटिया ग्रृपचे आधारवड आणि कापूस व्यवसायीक शिवप्रकाश रूहाटिया यांच्या आई नर्मदादेवी यांचे काल बुधवार १३ मार्चला मध्यरात्री नंतर कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ८९ वर्षाचे होते.

त्यांच्या मागे डॉ.ओमप्रकाश शिवप्रकाश, श्रीप्रकाश, विजयप्रकाश, संजयप्रकाश व अजयप्रकाश ही मुले, सुना, एक मुलगी, जावाई आणि नात नातवंडासह मोठा आप्त परिवार आहे. अलिकडच्या काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग जडला होता. यासाठी योग्य उपचार सुरू होते, वयोमानाने उपचाराला अल्प प्रतिसाद मिळत असताना काल रात्री उशिरा घरीच निधन झाले.
नर्मदादेवी रूहाटिया यांची अंत्ययात्रा आज गुरुवार १४ मार्चला दुर्गा चौक येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानावरुन सकाळी ११ वाजता मोहता मिल मोक्षधामसाठी निघणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!