अकोला दिव्य न्युज ब्युरो : नवी दिल्ली येथे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनतर्फे २०२३-२४ या सत्रासाठी आयोजित इंटरनॅशनल इंग्लिश, सायन्स आणि मॅथ ऑलिम्पियाड परीक्षेत हॅपी अवर्स स्कुलतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
IEO मध्ये इयत्ता 1ली मधील टॉपर विद्यार्थी काव्या कासार, स्वरा मिरगे, श्लोक तळे, ईश्वरी गोरे यांनी सुवर्णपदक मिळाले. आता IEO मध्ये इयत्ता 2 मधील टॉपर म्हणजे 1 ला रँकर श्रेयस कांबळे, प्रवण खंदारे हे वर्ग टॉपर आहेत. IFO मध्ये इयत्ता तिसरीतील रिद्धी लांडे आणि मिताली गवळी यांना सुवर्णपदक मिळाले. IEO मध्ये इयत्ता 4 चे चैतन्य देशमुख, वेदिका गांधी इयत्ता टॉपर आहेत, इयत्ता 5 वी तील आयुष जैस्वाल, इयत्ता टॉपर आणि 7 व्या इयत्तेतील रुतुजा ताले, अर्पिता मोहोड या क्लास टॉपर आहेत. आठवी इयत्ताची सिद्धिका शुक्ला हिला सुवर्णपदक मिळाले.तर इयत्ता 9 मधील श्रेयस कौंडाण्य क्लास टॉपर आहे.
नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये इयत्ता 1 लीचा विश्वा गावंडे, इयत्ता 3 रीचा चैतन्य गावंडे तर चौथी इयत्ता मधील श्लोक लोडम, भावेश शर्मा, इयत्ता 5 वीचा शार्व भागवतकर क्लास टॅपर आहेत. इयत्ता 7 वीची अनुज गावंडे आणि आठवी इयत्ता 8 वीची अक्षरा कोरडे व इयत्ता 9 वीचा आर्यन हिवराळे यांनी सुवर्णपदक पटकाविले.
आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड परीक्षेत इयत्ता पहिली – काव्या कासार, इयत्ता दुसरीचा प्रणव खंडारे, इयत्ता 3 रीची पूर्वा इंगळे, इयत्ता 4 चा शर्वरी तायडे, इयत्ता 5 वीचा शर्व भागवतकर, इयत्ता 6 वी – सिद्धी पडोळे, इयत्ता 7 वी – पूजन शर्माला, इयत्ता 8 चार – श्रेयस गावंडे, इयत्ता 9वी – क्षितिज कुचेकर यांनी सुवर्ण पदक मिळवून नावलौकिक केले. तर इयत्ता 10 वीची अनुश्री घाटोळे ही इयत्ता टॉपर आहे. तीनही विषयाच्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन व करुन घेतलेल्या सरावामुळे हे यश मिळाले आहे. संस्थेच्या अध्यक्षा ज्योती संगर यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक व शिक्षकांचे अभिनंदन केले.