अकोला दिव्य न्युज ब्युरो : तिसर्या सब-ज्युनीयर राष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणी बॉक्सींग स्पर्धेमध्ये प्रभात किड्स स्कूलच्या तीन खेळाडूंनी उत्कृष्ट यश संपादीत केल्याने त्यांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने वसंत देसाई स्टेडीयम, अकोला येथे आयोजित तिसर्या सब-ज्युनीयर राष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणी बॉक्सींग स्पर्धेमध्ये मुलांमधून प्रभात किड्स स्कूलचा शाश्वत महल्ले ह्याने 55 ते 58 वजन गटात सुवर्ण पदक मिळविले. मुलींमध्ये गार्गी राऊत हिने 55 ते 58 वजन गटात सुवर्ण पदक तर ईशीता झांबरे हिने 37 ते 40 वजन गटात सुवर्ण पदे घेऊन उत्कृष्ट यश प्राप्त केले.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समनव्यक मो. आसिफ व क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.
पश्चिम विभागीय बॉक्सींग स्पर्धेत प्रभातचा दबदबा
गुजरात येथे झालेल्या बॉक्सींग स्पर्धेचे आयोजन निकोल क्रीडा संकुल, अहमदाबाद येथे दि. 5 ते 7 मार्च दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शाश्वत महल्ले (सुवर्ण) व गार्गी राऊत (सुवर्ण) तर ईशीता झांबरे हिने रजत पदक पटकावून यश मिळविले.