अकोला दिव्य न्युज ब्युरो : पश्चिम विदर्भातील ख्यातनाम डाळ उत्पादक व व्यावसायिक खटोड कुटुंबातील आधारस्तंभ सुनील खटोड यांनी आज बुधवार १३ मार्चला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या ५६ व्या वर्षात शेवटचा श्वास सोडला. त्यांच्या निधनाने खटोड कुटुंबांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय क्षेत्रात शोककळा पसरली असून, हे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले गोविंद व मुकुंद, एक मुलगी, सुन,जावाई आणि मोठे आप्त परिवार आहे.
खटोड कुटुंबांच्या नवीन पिढीचे आधारवड पुरुषोत्तम खटोड़ यांचे ते धाकटे बंधू तर संजय,कृष्णा,शिवशंकर, केशव, माधव व राघव यांचे मोठे भाऊ होते. डॉ अम्बरीश व डॉ कौस्तुभ यांचे काका होते. अलिकडच्या काही महिन्यांपूर्वी मेंदूच्या रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्याने ते बेशुद्ध पडले. शहरातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने दखल करण्यात आले. त्यांच्यावर शर्थीचे प्रयत्न करीत उपचार सुरू होते. जवळपास सहा महिन्यांपासून मृत्यूसोबत झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत आज मावळली. हसतमुख चेहरा, लाघवी बोलणे आणि मनमिळावू स्वभावामुळे सुनील खटोड यांचा मित्रांचा मोठा गोतावळा होता.
सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी होऊन शक्यतो मदतीला ते नेहमी तत्पर असत. उद्या गुरुवार १४ मार्चला गोरक्षण रोड येथील किर्ती नगर मधील त्यांच्या राहत्या निवासस्थानावरुन सकाळी ९.३० वाजता, मोहता मिल मोक्षधामसाठी अंतिम यात्रा निघणार आहे. खटोड कुटुंबांच्या दुःखात अकोला दिव्य परिवार सहभागी असून, ईश्वर हे दुःख सहन करण्याची खटोड कुटुंबीयांना शक्ती प्रदान करो.